27 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेषवाघाच्या बदल्यात 'नखे'!

वाघाच्या बदल्यात ‘नखे’!

लंडनच्या म्युझियमला प्रस्ताव

Google News Follow

Related

अफजलखानाचा कोथळा बाहेर काढताना छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे महाराष्ट्राला कायमस्वरूपी मिळावीत, यासाठी राज्य सरकारने लंडनच्या म्युझियमला त्या बदल्यात वाघाची जोडी देण्याचा प्रस्ताव दिला आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली.

सध्या ही वाघनखे लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये आहेत. ही वाघनखे परत आणण्यासंदर्भात म्युझियमशी होणाऱ्या सहकार्य करारावर स्वत: मुनगंटीवार हे ३ ऑक्टोबर रोजी स्वाक्षरी करणार आहेत. ‘सुरुवातीला त्यांनी ही वाघनखे केवळ एका वर्षासाठी देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र आता ते तीन वर्षांसाठी देण्यास तयार झाले आहेत. आम्ही त्यांना सांगितले, आम्हाला आणची वाघनखे परत द्या, हा प्रश्न संवादाने सुटेल,’अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली. राज्य सरकारने या संदर्भात नियुक्त केलेला गट ब्रिटनमधील सर्व वस्तूसंग्रहालयाला भेट देणार असून आणखी काही वस्तू तेथून आणता येतील का, हेही बघणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

ईदच्या जुलूसमधील टवाळखोरांकडून महिला पोलीस कॉन्स्टेबलची छेड, विक्रोळीत तणाव

सुप्रियाताई, विद्यार्थ्यांची दिशाभूल करू नका, वास्तव समजून घ्या!

तब्बल सात तास गळ्यापर्यंत मातीत अडकले, बाकी कुणीच वाचले नाही…किल्लारी भूकंपाच्या विदारक आठवणी

अमेरिकेमध्ये १ ऑक्टोबरपासून शटडाऊनचे संकट

वाघनखे तीन वर्षांसाठी न आणता कायमस्वरूपी महाराष्ट्राकडे राहावीत, यासाठी महाराष्ट्र सरकारने ब्रिटन सरकारला वाघाची जोडी देण्याचा प्रस्तावही सादर केला आहे. ही वाघनखे कायमस्वरूपी महाराष्ट्रात राहावीत, यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. मुनगंटीवार हे पुढील आठवड्यात लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या सहकार्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी लंडनला जाणार आहेत. ‘सुरुवातीला ते केवळ एका वर्षासाठी वाघनखे देणार होते. आता त्यांनी तीन वर्षांसाठी मंजुरी दिली आहे.

मात्र महाराष्ट्र सरकार कायमस्वरूपी ही वाघनखे महाराष्ट्रात ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्या बदल्यात आम्ही नर आणि मादींची वाघाची जोडी देण्याचा प्रस्तावही त्यांच्या समोर ठेवला आहे,’ असे त्यांनी सांगितले. ही वाघनखे भारतात आल्यानंतर ती साताऱ्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, नागपूरमधील सेंट्रल पॅलेस, कोल्हापूरमधील लक्ष्मीविलास पॅलेस आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयात प्रदर्शित केली जाणार आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा