25 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेषरविवारी राज्यभर स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’

रविवारी राज्यभर स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’

उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Google News Follow

Related

स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ या रविवार १ ऑक्टोबर रोजीच्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात स्वच्छतेत अव्वल स्थान मिळवून देऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात शहरे तसेच ग्रामीण भागात ‘एक तारीख एक तास’ हा उपक्रम केंद्र शासनाने आयोजित केला असून नागरिकांनी स्वच्छता, साफ-सफाई करून या अभियानात सहभागी व्हायचे आहे. गाव तसेच शहरातल्या प्रत्येक वार्डात सकाळी १० वाजेपासून या मोहिमेची सुरवात होईल. यात सफाई मित्र ही सहभागी होतील.

हे ही वाचा:

आशियाई स्पर्धेत टेनिसमध्ये भारताला सुवर्ण

तब्बल सात तास गळ्यापर्यंत मातीत अडकले, बाकी कुणीच वाचले नाही…किल्लारी भूकंपाच्या विदारक आठवणी

न्यूयॉर्कमध्ये पूर; रस्त्यांना आले नद्यांचे रूप

दसरा मेळाव्यावरून पुन्हा एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे ‘मैदानात’

मुख्यमंत्री आपल्या आवाहनात म्हणतात की, की ‘एक तारीख एक तास’ या उपक्रमाला स्वच्छता लोकचळवळीचे रूप द्यायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाला आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यायचा आहे. आपण, आपले कुटुंबिय किंवा सहकारी जिथे कुठे असाल, तिथे आपण स्वच्छता मोहिम राबवून या अभियानात योगदान द्यायचे आहे. आपआपल्या परिसरात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच गावा-गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या पुढाकारांनी स्वच्छता मोहिम राबवायची असून स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल आणि जिल्हा प्रशासन आपल्या मदतीसाठी सज्ज असेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा