महाराष्ट्राचे आराध्यदैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. सध्या ब्रिटनच्य़ा व्हिक्टोरिया अलबर्ट संग्रहालयामध्ये ही वाघनखे आहेत. येत्या ३ ऑक्टोबरला राज्याचे सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार ब्रिटनला जाणार आहेत. त्यावेळी व्हिक्टोरिया अलबर्ट संग्रहालयासोबत एक करार करण्यात येईल आणि १६ नोव्हेंबरला ही वाघनखं मुंबईत येणार आहेत. त्यामुळे आनंदाचे वातावरण आहे, मात्र, या मुद्द्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे, अशा चर्चा घडू लागल्या आहेत.
देशभरातील शिवप्रेमींमध्ये या वाघनखांच्या दर्शनाची आतुरता आहे. याची देही, याची डोळा ही वाघनखं पाहायची आहेत. त्यामुळे वाघनखं परत भारतात आणणार ही शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. मात्र, या वाघनखांवरुन आदित्य ठाकरे यांनी अजब सवाल उपस्थित केले आहेत. “वाघनखं परत आणणार असं आम्हाला सांगितलं होतं. राज्य सरकारकडून यावर स्पष्टीकरण पाहिजे. छत्रपती म्हणजे आमचे दैवत आहेत. भावनांशी खेळ कुठेही नको. व्हिक्टोरिया अलबर्ट संग्रहालयाच्या वेबसाइटवर सांगितलय की, ही वाघनखे जेम्स ग्रॅण्ड डफ हे इतिहासाकार होते, त्यांच्या कलेक्शनमधली आहेत. जेम्स ग्रॅण्ड डफ यांचा दावा आहे की, ती वाघनखं महाराजांनीच वापरली. पण व्हिक्टोरिया अलबर्ट म्युझिमच्या वेबसाइटवर म्हटलय की, महाराजांनीच ही वाघनखं वापरली हे सांगू शकत नाही. भावनांचा खेळ कुठही नको,”
हे ही वाचा:
विसर्जन सोहळ्यादरम्यान हरवलेल्या २२ मुलांना पालकांकडे सोपवले!
आशियाई स्पर्धेत टेनिसमध्ये भारताला सुवर्ण
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्राकडे तीन वर्षांसाठी येणार!
शिक्षिकांचे विद्यार्थ्यांना आदेश…आमचे रिल्स लाइक करा, शेअर करा!
ही वाघनखे परतावा आहेत की, भाडेतत्वावर घेऊन येणार आहेत, असा सवाल त्यांनी विचारला. जीआर प्रमाणे ही वाघनखे दर्शनाकरिता तीन वर्षाच्या कालावधीसाठी देण्याचे व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने मान्य केले आहे. मग ही वाघनखे कर्जावर आहे की, परतावा आहे. जर परतावा असेल, तर महाराजांचे मंदिर बांधावे आणि त्यात ही वाघनखे ठेवली जावी. पण वाघनखे शिवकालीन आहे की, महाराजांनी वापरलेली आहेत. यासंदर्भात राज्य सरकारकडून स्पष्टीकरण यावे, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.