आशियाई स्पर्धेत भारताची यशस्वी कामगिरी सुरूच असून भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण पदक आले आहे. शुक्रवार, २९ सप्टेंबर रोजी आशियाई स्पर्धेत रायफल खेळात भारताच्या मेन्स टीमने ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. स्वप्नील कुसळे, ऐश्वर्य प्रताप सिंग आणि अखिल श्योराण या तिघांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली असून हे पदक मिळवलं आहे.
या खेळात भारताच्या संघाने यावेळी एकूण १७६९ गुण मिळवले. यापूर्वी अमेरिकेने गेल्या वर्षी पेरुमध्ये झालेल्या स्पर्धेत मिळवलेल्या गुणांपैकी आठ गुण जास्त मिळवले. या स्पर्धेत चीनने १७६३ गुण (रौप्य पदक) मिळवले आणि कोरियाच्या संघाने १७४८ गुण (कांस्य पदक) मिळवले.
भारताकडून स्वप्नील आणि ऐश्वर्यने प्रत्येकी ५९१ गुण मिळवले. या गुणांसह त्यांनी क्वालिफिकेशन स्टेज पार केली आणि एशियन गेम्समध्ये नवीन रेकॉर्डही मोडला. अखिलने ५८७ गुण मिळवले. पाचव्या क्रमांकावर राहून देखील अखिल वैयक्तिक क्रीडाप्रकारात अंतिम फेरीत पोहोचला नाही. कारण, वैयक्तिक स्पर्धेमध्ये एका देशाकडून दोनच खेळाडू भाग घेऊ शकतात.
Hangzhou Asian Games: Aishwary Pratap Singh Tomar, Swapnil Kusale and Akhil Sheoran win gold in 50-metre Rifle 3Ps Men's team event pic.twitter.com/JGv3kV0EYD
— ANI (@ANI) September 29, 2023
हे ही वाचा
रेल्वे कर्मचारी ‘घुसले’ मोबाईलमध्ये, रेल्वे शिरली प्लॅटफॉर्मवर!
‘बारामती ऍग्रो’ प्लांट ७२ तासांत बंद करण्याच्या रोहित पवारांना सूचना
विमानतळांची कामे मार्गी लावण्यासाठी खासगी कंपनीकडील पाच विमानतळांचा ताबा ‘एमआयडीसी’ने घ्यावा
सन २०२४ आणि २०२९मध्ये ‘एक देश, एक निवडणूक’वर उमटू शकते मोहोर!
भारतीय नेमबाजांनी आतापर्यंत पाच सुवर्णांसह १५ पदके जिंकली आहेत. तर पदकांच्या तक्त्यात भारत २७ पदकांसह चौथ्या स्थानी आहे. सात सुवर्ण पदके, ९ रौप्य पदके आणि ११ कांस्य पदके भारताच्या नावे आहेत.