25 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरराजकारणमुलुंडमध्ये कोविड रुग्णालयांची संख्या वाढवा - प्रकाश गंगाधरे

मुलुंडमध्ये कोविड रुग्णालयांची संख्या वाढवा – प्रकाश गंगाधरे

Google News Follow

Related

मुंबई महापालिका हद्दीचे शेवटचे टोक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलुंड शहरात कोविड रुग्णालयांची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी मुलुंडचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक प्रकाश गंगाधर यांनी केली आहे. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र लिहून गंगाधरे यांनी ही मागणी केली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून त्याला मुलुंडही अपवाद नाही. मुलुंडमध्येही वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता नगरसेवक प्रकाश गंगाधर याणी ही मागणी केली आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रात येणाऱ्या मुलुंड या भागात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईमध्ये जिथे दिवसाला पाच ते सहा हजार कोरोना रुग्ण सापडत आहेत, मुलुंडमध्ये हा आकडा दिवसाला तीनशे ते साडे तीनशे इतका आहे. या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या मानाने मुलुंडमध्ये उपलब्ध असलेली तर रुग्णालये कमी पडत आहेत, तर रुग्नांना ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स इत्यादी आवश्यक आरोग्य सुविधांसाठी धावाधाव करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने तात्काळ कार्यवाही करत मुलुंडमधील रुग्णालयांची संख्या वाढवावी अशी मागणी प्रकाश गंगाधरे यांनी केली आहे. यासोबतच मुंबईची बिघडलेली परिस्थिती लक्षात घेता मुंबईमध्ये डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी यांचीदेखील कमतरता जाणवत आहे. त्यामुळे महापालिकेने त्वरित उपाययोजना करत आरोग्य कर्मचाऱ्यांचीही संख्याही वाढवण्यात यावी असे गंगाधरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

हे ही वाचा:

औरंगाबादमधील लॉकडाऊन रद्द; इम्तियाज जलिल यांच्या मिरवणुकीत कोरोना नियमांचा फज्जा

अनिल देशमुख यांच्या विरोधातील चौकशी समिती म्हणजे निव्वळ धुळफेक

इशरतच्या पाठिराख्यांचा पर्दाफाश

दरम्यान मंगळवारी मुंबई महापालिकेने एक आदेश काढत मुंबईतील खासगी रुग्नालयांच्या ८०% खाटा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता कोरोना रुग्णांना या खाटा महापालिकेच्या नियोजनातुन देण्यात येणार आहे. तर दुसऱ्या बाजूला लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण मुंबईतील वाढती कोरोना रुग्णांची आकडेवारी बघता त्याला पुरेसे बेड्स मुंबईमध्ये उपलब्ध नाहीयेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा