22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामाकोल्हापुरात दोन मंडळांमध्ये राडा; दगडफेकीत तीन जखमी

कोल्हापुरात दोन मंडळांमध्ये राडा; दगडफेकीत तीन जखमी

मुख्य मार्गावर येण्यावरून कार्यकर्ते भिडले

Google News Follow

Related

कोल्हापुरात विसर्जन मिरवणूक पहिले कोणत्या मंडळाची विसर्जन मिरवणूक निघणार यावरून राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. मिरवणुकीत आधी येण्यावरून दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडल्याने कोल्हापुरात मध्यरात्री तुफानी राडा झाला. या हाणामारीत दगडफेक झाल्याने तीन जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मध्यस्ती करत कार्यकर्त्यांना पांगवले.

कोल्हापुरात मुख्य मिरवणूक मार्गासह समांतर आणि पर्यायी असे तीन मार्ग आहेत. यामध्ये मुख्य मिरवणुकीत मार्गात प्रवेश करण्यासाठी मंडळांची चढाओढ असते. त्यामुळे या मार्गात येण्यासाठी बुधवारी सायंकाळपासूनच तयारी सुरू करण्यात आली होती. एका मंडळाची ट्रॉली आणि कार्यकर्ते खरी कॉर्नरकडून मुख्य मार्गाकडे येण्याचा प्रयत्न करत असतानाच खरी कॉर्नरजवळ थांबलेल्या दुसऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. याच कारणातून वादाची ठिणगी पडली.

या वादाचे रुपांतर पुढे हाणमारीत झाले आणि दगडफेकही करण्यात आली. त्यामुळे देखावे पाहण्यासाठी कुटुंबीयांसमवेत आलेले लोक वाट मिळेल त्या दिशेने धावू लागले. या दगडफेकीत तिघे जखमी झाले. यावेळी पोलिसांनी दखल घेत दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांना पांगवले. या प्रकाराने खरी कॉर्नर परिसरात तणाव निर्माण झाला होता. जखमी झालेल्या तिघांना खासगी वाहनातून रुग्णालयात नेण्यात आले.

हे ही वाचा:

जमीन गहाण टाकून ७५ लाखांच्या घोड्याची खरेदी; सुवर्णपदक विजेत्या घोडेस्वारांची कमाल!

सन २०२४ आणि २०२९मध्ये ‘एक देश, एक निवडणूक’वर उमटू शकते मोहोर!

नगरसेवकांचा सहानुभूतीवर भरोसा नाय काय?

फरार उद्योगपती नीरव मोदीची उंदीर-घुशींपासून सुटका!

दोन मंडळातील कार्यकर्ते भिडल्याची माहिती मिळताच बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कार्यकर्त्यांना पांगवले. पोलिसांनी खरी कॉर्नरकडे जाणाऱ्या मार्गावर गाडी लावून दंगा करणाऱ्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. याच वेळी काही कार्यकर्ते वाद घालू लागल्याने त्यांना ताब्यात घेण्याचा पवित्रा पोलिसांनी घेतला. तेव्हा कार्यकर्ते बाजूला गेले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा