32 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरराजकारणव्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या खासदारांवर कारवाई करणार

व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या खासदारांवर कारवाई करणार

गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

Google News Follow

Related

नारीशक्ती वंदन अधिनियम २०२३ संदर्भात लोकसभेत झालेल्या मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहून शिवसेनेचा व्हीप डावलणाऱ्या खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी दिला. मुंबईतील बाळासाहेब भवन येथे बुधवार, २७ सप्टेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला समर्थन करणाऱ्या विनायक राऊत, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव या चार खासदारांचे निलंबन करण्याबाबतही कायदेशीर सल्ला घेत असून याबाबत लोकसभा अध्यक्षांना देखील निवेदन देणार असल्याचे शेवाळे यांनी स्पष्ट केले.

शेवाळे म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेसप्रणीत आघाडीतील सर्व खासदारांनी महिला आरक्षण विधेयकाला समर्थन दिल्याचे जाहीर केले होते. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे.त्यांच्या आघाडीतील अनेक खासदार या विधेयकाच्या मतदाना दरम्यान अनुपस्थित होते. लोकसभेत शिवसेना पक्षाचे प्रतोद पद खासदार भावनाताई गवळी यांच्याकडे असून त्यांनी जारी केलेला व्हीप शिवसेनेच्या सर्व खासदारांना बंधनकारक आहे. १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान आयोजित केलेल्या विशेष अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी खासदार गवळी यांनी पक्षाच्या वतीने सर्व खासदारांना व्हीप जारी केला होता. मात्र उबाठा गटाला समर्थन करणाऱ्या चार खासदारांनी या व्हीपचे उल्लंघन केले.

हेही वाचा..

कांदळवन क्षेत्रात अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्या

रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचा फटका हवाई दल अधिकाऱ्याला; सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला १.५४ कोटींचा दंड

गैरसोय टाळण्यासाठी कांदा खरेदी तातडीने सुरू करा

भाजपा अध्यक्ष नड्डा आरती करताना मोठी दुर्घटना टळली !

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच महिला आरक्षणाच्या समर्थनाची भूमिका घेतली होती. पण त्यांच्या विचारांचा वारसा सांगणारे हे चार खासदार महिला आरक्षण विधेयका विषयी मतदानाच्या वेळी सभागृहात उपस्थित नव्हते, ही लाजिरवाणी आणि दुर्दैवी घटना आहे. यापैकी खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार हे तर दिल्लीमध्ये असूनही ते सभागृहात आले नाहीत. महिलांचा अवमान करणाऱ्या या खासदारांना जनता त्यांची जागा दाखवून देईल. तसेच अनेक वर्षे प्रलंबित असलेले महिला आरक्षण विधेयक सभागृहात मांडण्याची राजकीय इच्छाशक्ती दाखविल्याबद्दल खासदार शेवाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा