25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषरुग्णालयाच्या निष्काळजीपणाचा फटका हवाई दल अधिकाऱ्याला; सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला १.५४ कोटींचा दंड

रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचा फटका हवाई दल अधिकाऱ्याला; सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला १.५४ कोटींचा दंड

रक्त संक्रमणामुळे हवाई दलातील अधिकारी एचआयव्ही पॉझिटिव्ह

Google News Follow

Related

लष्करी रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचा फटका हवाई दलातील एका अधिकाऱ्याला बसला आहे. रक्त संक्रमणामुळे हवाई दलातील अधिकारी एचआयव्ही पॉझिटिव्ह झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढत लष्कर आणि हवाई दलाला दंड ठोठावला आहे.

लष्कराच्या रुग्णालयात वैद्यकीय निष्काळजीपणामुळे एचआयव्ही पॉझिटिव्ह झालेल्या हवाई दलाच्या एका माजी अधिकाऱ्याला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. लष्कराच्या रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे हवाई दलाचे माजी अधिकारी २००२ मध्ये एचआयव्ही पॉझिटिव्ह झाले होते. त्यानंतर त्यांनी कायदेशीर लढाई लढली होती. त्यात त्यांना यश आले असून सर्वोच्च न्यायालयाने लष्कर आणि हवाई दलाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयात मंगळवार, २६ सप्टेंबर रोजी या प्रकरणी सुनावणी पार पडली. भारतीय हवाई दलाला माजी हवाई दल अधिकाऱ्याला १.५४ कोटी रुपये भरपाई देण्याचे निर्देश भारतीय लष्कर आणि हवाई दलाला देण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दिलेल्या आदेशात म्हटलं आहे की, “वैद्यकीय निष्काळजीपणामुळे याचिकाकर्ता १ कोटी ५४ लाख ७३ हजार रुपयांच्या नुकसान भरपाईसाठी पात्र आहे. यासाठी व्यक्ती कोणालाही जबाबदार धरू शकत नाही, त्यामुळे भारतीय हवाई दल आणि भारतीय लष्कर या निष्काळजीपणासाठी जबाबदार आहे. ही रक्कम भारतीय हवाई दल सहा आठवड्यांच्या आत याचिकाकर्त्याला देईल. भारतीय हवाई दल लष्कराकडून अर्धी रक्कम मागू शकतात.”

हे ही वाचा:

रायफल स्पर्धेत सिफ्ट कौर सामराची सुवर्ण, आशी चौक्सीची कांस्य पदकाला गवसणी

एनआयएकडून खलिस्तानी- गँगस्टर्स विरोधात कारवाईचा बडगा

नाझी सैनिकाचा गौरव; कॅनडाच्या लोकसभा अध्यक्षाचा राजीनामा

इराकमध्ये लग्नसोहळ्यात लागलेल्या आगीत १०० ठार

नेमकं प्रकरण काय?

याचिकाकर्ते माजी हवाई दल अधिकाऱ्यावर २००२ साली लष्करी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. हे अधिकारी १३ डिसेंबर २००१ मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरु केलेल्या ‘ऑपरेशन पराक्रम’ चा एक भाग होते. माजी हवाई दल अधिकारी हे ड्युटीवर असताना आजारी पडले होते. त्यांना जुलै २००२ मध्ये लष्करी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. जिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि यावेळी त्यांना रक्त चढवण्यात आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांना एचआयव्हीची लागण झाल्याचं समोर आलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा