28 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेष... आणि पंतप्रधान मोदींनी थेट मनमोहन सिंग यांना केला फोन

… आणि पंतप्रधान मोदींनी थेट मनमोहन सिंग यांना केला फोन

एएनआय वृत्तसंस्थेने दिली माहिती

Google News Follow

Related

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा मंगळवार, २६ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यांचा हा ९१ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना थेट फोन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांच्या प्रकृतीची देखील त्यांनी विचारपूस केली. एएनआय वृत्तसंस्थेने यासंबंधी माहिती दिली आहे. तत्पूर्वी मंगळवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन मनमोहन सिंग यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “मनमोहन सिंग यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्याची कामना करतो,” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना थेट फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देत विचारपूस केली.

हे ही वाचा:

भारतीय खेळाडू ‘घोड्या’वर स्वार

वहिदा रहमान यंदाच्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी

शरद पवारांच्या पत्रकारांबद्दलच्या भूमिकेचा व्हिडिओ पुन्हा व्हायरल !

काश्मीरवरील पाकच्या अतिक्रमणाबाबत जीनिव्हामध्ये निदर्शने !

वयाची नव्वदी पार केल्यानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती ठीक नसते. व्हिलचेअरवरुनच त्यांचे दैनंदिन कामकाज सुरु असते. काही दिवसांपूर्वी राज्यसभेतही मनमोहन सिंग यांनी व्हिलचेअरवरुनच हजेरी लावली होती. त्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतच्या विधेयकावर मतदानासाठी मनमोहन सिंगांनी हजेरी लावली होती. त्यांचा हा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण पक्षाची गरज लक्षात घेता त्यांनी आपलं कर्तव्य बजावलं होतं.

मनमोहन सिंग यांनी मोदींचे केले होते कौतुक 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या सुरू असलेल्या वाटचालीबद्दल माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कौतुकोद्गार काढले होते. रशिया युक्रेन संघर्षात भारताची भूमिका खूप महत्त्वाची असल्याची टिप्पणी मनमोहन सिंग यांनी केली आहे. भारताने याबाबतीत अगदी योग्य पाऊल उचलल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा