भारताने घोडेस्वारी प्रकारात पदकाला गवसणी घालत ऐतिहासिक अशी कामगिरी केली आहे. तब्बल ४१ वर्षानंतर या खेळ प्रकारात पदक जिंकण्याची कामगिरी केली आहे. घोडेस्वारीमधील टीम ड्रेसेज प्रकारात भारतीय संघाने सुवर्ण पदक जिंकले आहे. भारतीय संघात दिव्यक्रीत सिंह, सुदिप्ती हजेला, ह्रद्य छेडा, अनुष अगरवाल्ला यांचा समावेश आहे.
चीनमध्ये सध्या आशियाई स्पर्धा सुरू आहेत. आशियाई स्पर्धेमधील मंगळवारच्या दिवसातील भारताचे हे आतापर्यंतचे तिसरे पदक आहे. यापूर्वी नौकानयनमध्ये भारताच्या नेहा ठाकूरने रौप्य तर इबादत अलीने कांस्य पदक जिंकले होते. त्यामुळे भारताच्या खात्यात आता एकूण १४ पदके आहेत. घोडेस्वारीमधील टीम ड्रेसेज प्रकारात भारतीय संघाने सुवर्ण पदक जिंकले. ४१ वर्षांनंतर भारताने ही ऐतिहासिक कामगिरी केली असून सर्वांकडून या संघाचे कौतुक होत आहे.
#EquestrianExcellence at the 🔝
After 41 long years, Team 🇮🇳 clinches🥇in Dressage Team Event at #AsianGames2022
Many congratulations to all the team members 🥳🥳#Cheer4India#HallaBol#JeetegaBharat#BharatAtAG22 🇮🇳 pic.twitter.com/CpsuBkIEAw
— SAI Media (@Media_SAI) September 26, 2023
तत्पूर्वी आशियाई क्रीडा २०२३ मध्ये भारताची नौकानयनपटू नेहा ठाकूर हिने महिलांच्या नौकानयन स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. आजच्या दिवसातील भारताचे हे पहिले पदक होते. याचबरोबर सेलिंगमध्येच विंड सर्फर स्पर्धेत इबादत अलीने कांस्य पदक जिंकले होते.
आता घोडेस्वारीमधील टीम ड्रेसेज प्रकारात भारतीय संघाने सुवर्ण पदक जिंकले. भारताने आतापर्यंत एकूण १४ पदके जिंकली आहेत. दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाने दोन सुवर्णांसह ११ पदके जिंकली होती. तिसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंकडून अनेक पदकांची अपेक्षा आहे.
हे ही वाचा:
वहिदा रहमान यंदाच्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी
शरद पवारांच्या पत्रकारांबद्दलच्या भूमिकेचा व्हिडिओ पुन्हा व्हायरल !
काश्मीरवरील पाकच्या अतिक्रमणाबाबत जीनिव्हामध्ये निदर्शने !
२६/११ हल्ला प्रकरणात चौथे पुरवणी आरोपपत्र दाखल, कॅप्टन तहव्वूर हुसैन राणाचा आरोप पत्रात उल्लेख
दुसरीकडे, तुलिका मान ज्युदोमध्ये कांस्यपदकाच्या लढतीत पोहोचली असून येथे विजय मिळवून ती कांस्यपदक जिंकू शकते. तर हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाने सिंगापूरविरुद्ध मोठा विजय नोंदवला आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी गट टप्प्यातील दुसऱ्या सामन्यात सिंगापूरचा १६-१ असा पराभव केला. भारताचा पुढचा सामना जपानशी असणार आहे.