25 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषओवैसींचे राहुल गांधींना हैदराबादमधून आपल्याविरोधात लढण्याचे आव्हान !

ओवैसींचे राहुल गांधींना हैदराबादमधून आपल्याविरोधात लढण्याचे आव्हान !

“अबकी बार वायनाड नाही, अबकी बार हैदराबाद, ओवेसी

Google News Follow

Related

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक हैदराबादमधून लढण्याचे आव्हान दिले आहे.राहुल गांधींच्या केरळमधील लोकसभा मतदारसंघाचा संदर्भ देत म्हटले,“अबकी बार वायनाड नाही, अबकी बार हैदराबाद, असे ओवेसी म्हणत राहुल गांधी याना आव्हान दिले आहे.

रविवारी, २५ सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे झालेल्या सभेत ओवेसी बोलत होते.ते म्हणाले, राहुल गांधी हे फक्त मोठमोठी विधाने- भाष्य देण्याचे काम करतात, तुम्ही मैदानात या माझ्याविरुद्ध लढून दाखवा, तुमच्या काँग्रेस पार्टीचे लोक याबाबतीत बरेच काही सांगतील पण मी तयार आहे, असे ओवेसी यांनी जाहीर सभेत उद्गार काढत राहुल गांधींना थेट लढण्याचे आवाहन दिले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) नेत्यांना प्रधानमंत्री मोदींनी आपलेसे मानले असल्याने त्यांच्यावर कोणतेही गुन्हे दाखल होत नाहीत असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यानंतर आता ओवेसी यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला आहे.

मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर कोणताही खटला नाही. एआयएमआयएमवर कोणताही खटला नाही. फक्त विरोधकांवर हल्ला केला जातो. मोदीजी कधीही आपल्या लोकांवर हल्ला करत नाहीत. ते मुख्यमंत्री आणि एआयएमआयएमच्या नेत्यांना आपले मानतात, त्यामुळे त्यांच्याविरोधात कोणताही खटला नसल्याचे वक्तव्य तेलंगणातील तुक्कुगुडा पार पडलेल्या सभेत राहुल गांधी यांनी केले होते.

हे ही वाचा:

संजय राऊत, अंबादास दानवेंच्या बोलण्यावर बंदी घालावी

६४३ कोटी किलोमीटर अंतर पार करून लघुग्रहाचा तुकडा घेऊन नासाचे कॅप्सूल पृथ्वीवर

कैसमीच्या भारतीय संगीत प्रेमाची पंतप्रधानांनी घेतली दखल

चांद्रयान ३, जी-२० परिषदेने भारताला शिखरावर नेले!

राहुल गांधी म्हणाले होते की, तेलंगणात काँग्रेस, भारत राष्ट्र समिती (BRS), भाजप आणि AIMIM हे एकमेकांना वेगळे पक्ष म्हणतात पण ते संगनमताने एकत्र काम करत आहेत.मी लोकसभेत बीआरएसचे खासदार पाहिले आहेत. जेव्हा भाजपला गरज होती तेव्हा त्यांच्या (बीआरएस) लोकांनी पाठिंबा दिल्याचे सांगत अनेक उदाहरण राहुल गांधी यांनी त्यावेळी दिली होती.

ओवैसी यांनी गैरमुस्लिम जागेवरून निवडणूक लढवावी
ओवेसींनी केलेल्या आव्हानाला काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी उत्तर दिले ते म्हणाले, ओवेसी यांनी कोणत्याही गैर मुस्लिम जागेवरून निवडणूक लढवावी.तुम्ही दुसऱ्याला आव्हान देता तर मग तुम्ही सुद्धा कोणत्याही गैर मुस्लिम जागेवरून निवडणूक लढवून दाखवावी. अशा लोकांच्या भाष्याला आम्ही अधिक महत्व देत नसल्याचे त्यांनी सांगितले.तसेच ओवेसी यांनी केलेल्या आव्हानाला योगायोग समजावा की अन्य काही समजावे कारण, जेव्हा-जेव्हा भाजपाला ओवेसींची गरज असते तेव्हा हे असे भाष्य करत असतात. भाजप आणि असदुद्दीन ओवेसी हे केवळ मित्र नसून जुळे भाऊ आहेत, कारण भाजप पार्टी जसा विचार करते तसेच ओवेसींची भाषणे असतात, ते पुढे म्हणाले.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा