27 C
Mumbai
Wednesday, November 20, 2024
घरविशेषउद्धव ठाकरे आणि काँग्रेस सध्या ‘ट्रोलिंग गँग’चे काम करत आहेत !

उद्धव ठाकरे आणि काँग्रेस सध्या ‘ट्रोलिंग गँग’चे काम करत आहेत !

नागपुरात पुराची पाहणी करताना एका व्यक्तीला ओढल्याच्या व्हिडिओ बाबत फडणवीसांचे स्पष्टीकरण

Google News Follow

Related

नागपुरात पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नागपूर दौऱ्यावर होते.दरम्यान, एका व्यक्तीने आपल्या घराची पाहणी उपमुख्यमंत्र्यांनी करावी म्हणून आग्रह धरला. तर फडणवीसांनी त्याचा हात धरून त्याला ओढल्याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला. देवेंद्र फडणवीस त्याच्याशी अरेरावीने वागत असल्याची चर्चा सुरू करण्यात आली पण नंतर याच व्यक्तिच्या घरी फडणवीस पोहोचले आणि त्याच्या घराची पाहणी केली.

 

नागपुरात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत होता. मात्र शुक्रवारी रात्री अचानक पावसाने जोर धरला आणि रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडून ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. कालपासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला.त्यामुळे अनेकजणांचे नुकसान झाले.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरातील पूरग्रस्त भागांना भेट दिली.पावसाच्या पाण्याने झालेल्या नुकसानाची माहिती सांगणाऱ्या एका व्यक्तीचा फडणवीसांनी हात पकडून त्यांनी त्याचे घर गाठले.या व्यक्तीला घरी घेऊन जात असताना त्याला जबरदस्तीने ओढून घेऊन जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.त्यानंतर विरोधकांनी त्यांनी केलेल्या अशा वृत्तीला सत्तेचा माज असल्याचे सांगत ट्विट केले.पावसाच्या पाण्याने झालेल्या नुकसानाची माहिती सांगणाऱ्या नागरिकांसोबत अहंकारी फडणवीसांची अरेरावी असे ट्विट करत भाजपवर निशाणा साधला.

हे ही वाचा:

कैसमीच्या भारतीय संगीत प्रेमाची पंतप्रधानांनी घेतली दखल

चांद्रयान ३, जी-२० परिषदेने भारताला शिखरावर नेले!

भारताची पहिल्या दिवशी दमदार कामगिरी, ५ पदकांची कमाई

भारताच्या जी-२० अध्यक्षपदाची संयुक्त राष्ट्रांकडून स्तुती !

या ट्विटला भाजप कडून उत्तर देत ट्विट केले, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज नागपुरातील पूरग्रस्त भागांना भेट दिली. त्यावेळी सदर व्यक्ती आणि इतर अनेकांची इच्छा होती की देवेंद्र फडणवीसांनी आपल्याही घरी यावे. नागपुरातील प्रत्येकाचेच प्रेम असल्याने आपला नेता घरी यावा, अशी त्यांची इच्छा असण्यात गैर नाही. पण, प्रत्येकाच्या घरी जाणे नेत्यालाही शक्य होतेच असे नाही. पोलिस त्याला थांबवित असल्याने, देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा हात धरुन गर्दीतून त्याला आपल्या जवळ घेतले आणि ‘चल बाबा तुझ्याही घरी येतो’, असे म्हटले आणि ते त्याचा हात धरुन त्याच्या घरी गेले सुद्धा! (गर्दीतून त्याला जवळ ओढल्याचा स्पष्ट व्हीडिओ आणि त्याच्या घरी प्रत्यक्ष भेट दिल्याचा व्हीडिओ सोबत जोडला आहे)

 

 

 

पण, अशा घटनेचे राजकारण कुणी करावे, तर जे कधीच जनतेत जात नाही त्यांनी. हा प्रकार किळसवाणा आणि नालायकपणाचा कहर आहे. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांनी विरोधी पक्षाचे रचनात्मक कार्य सोडून ‘ट्रोलिंग गँग’चे काम स्वीकारले, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! राज्यातील जनतेने नाकारल्याने आता तसेही तुम्हाला त्याशिवाय दुसरा कामधंदाही उरला नाही. त्यामुळे लगे रहो…!

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
192,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा