गणेशोत्सव म्हटला की, अनेकांच्या प्रतिभेला अंकूर फुटतात. वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती, सजावट, मखर याचे विविधांगी प्रयोग केले जातात. आता तर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची परंपरा सुरू झाली आहे. त्यामुळे त्यादृष्टीने गणेशोत्सव साजरा केला जातो. श्री गणेश मित्र मंडळ, राईपाडा, उंदेराई रोड, मालाड (प) येथील गणेशमंडळाने यावेळी पर्यावरणाला समोर ठेवून नवा प्रयोग केला आहे.
प्रत्येक गणेशोत्सवाला मंडळातील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. जिथे ज्येष्ठ नागरिक व नवतरुण कार्यकर्ते एकत्रित येऊन गणेशोत्सव दरवर्षी आगळ्यावेगळ्या बाप्पाच्या मूर्तीचे स्वरूप सादर करतात. ह्या वर्षी कल्पकतेने नाविन्याची जोड देऊन १५० पुठ्ठयांमध्ये कोरीव काम करून जवळपास ५८४ पुठ्ठयांच्या तुकड्यांपासून ३डी लेयर्ड पद्धतीचा पर्यावरणपूरक असा सहा फूट उंचीचा गणपती बाप्पा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तयार केला आहे. तसेच किल्ले संवर्धनाचा देखावा सादर केला आहे.
हे ही वाचा:
चांद्रयान ३, जी-२० परिषदेने भारताला शिखरावर नेले!
भारताच्या जी-२० अध्यक्षपदाची संयुक्त राष्ट्रांकडून स्तुती !
मुंबईत दीड दिवसाच्या गणेशमूर्तींच्या कृत्रिम तलावातील विसर्जनात यंदा २३ टक्के वाढ
निज्जरच्या हत्येनंतर एफबीआयने यूएस खलिस्तान्यांना केले होते सावध !
या मंडळाचा हा ४१वा गणेशोत्सव असून १९८३मध्ये या मंडळाची स्थापना झाली होती.