24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामाहे आहेत कॅनडाशी संबंधित दहशतवादी !

हे आहेत कॅनडाशी संबंधित दहशतवादी !

एनआयएने जाहीर केली गँगस्टरची नावे

Google News Follow

Related

राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने बुधवारी ४३ गुन्हेगारांची नावे जाहीर केली आहेत. यातील अनेकजण कॅनडात राहात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दहशतवादी तसेच गुंडांचे जाळे निकामी करण्यासाठी एनआयने मोहीम हाती घेतली असून त्याआधारेच ही यादी जाहीर करण्यात आली आहे. यातील अनेक गुन्हेगारांचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे सांगितले जाते. एनआयएने या आरोपींची छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत.

१. अर्शदीप गिल उर्फ अर्श दल्ला : सध्या कॅनडात राहणारा दल्ला हा खलिस्तान टायगर फोर्स (केडीएफ)चा प्रमुख सहकारी आहे. या संघटनेला पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेचा पाठिंबा आहे. भारतातील दहशतवादी कारवायांचे कट रचण्यात त्याचा सहभाग असल्याचे मानले जाते. पंजाबमध्ये नुकत्याच एका काँग्रेसनेत्याची हत्या झाली होती. त्यामागेही याचाच हात असल्याचे सांगितले जाते. तो सर्व दहशतवादी कारवायांची सूत्रे कॅनडातून हलवतो, असे एनआयएच्या तपासात आढळून आले आहे.

हे ही वाचा:

मुस्लिम महिलांना आरक्षणात स्थान नसल्यामुळे विधेयकाला ओवैसींचा विरोध !

लष्करी अधिकारी-जवनांमध्ये फूट पाडू नका!

धावत्या टॅक्सिमध्ये गतिमंद मुलीवर बलात्कार !

खलिस्तानी दहशतवादी सुखदूल सिंग याची कॅनडामध्ये गोळ्या घालून हत्या

२. लखबीर सिंग लिंडा : कॅनडामध्ये राहणाऱ्या लिंडा याचाही दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे मानले जाते. अनेक मोठ्या व्यक्तींच्या हत्येचा कट आखण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात त्याचा सहभाग आहे. अनेक गुंडांना आश्रय देण्यापासून त्यांना निधी पुरवण्याचेही काम तो करतो.
३. गोल्डन ब्रार : सिद्धू मूजवाला हत्येमागील सूत्रधार ब्रार असल्याचे मानले जाते. गेल्या वर्षी सिद्धू मूजवाला या पंजाबी गायकाची हत्या झाली होती.

४. लॉरेन्स बिश्नोई : भारतातील सर्वांत कुख्यात असा हा गुंड अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहे.
५. अनमोल बिश्नोई : लॉरेन्स बिश्नोईचा लहान भाऊ असलेला अनमोल सध्या अमेरिकेत लपला असल्याचे सांगितले जाते. सिद्धू मूजवाला हत्याप्रकरणात तो प्रमुख आरोपी आहे.
६. जगदीपसिंग उर्फ जग्गू भगवानपुरी : हा सध्या पंजाब तुरुंगात आहे. दहशतवादी संघटनांना स्थानिक पातळीवर मदत पुरवण्याचे काम तो करतो. मात्र तुरुंगात असूनही तो पाकिस्तानमधून ड्रोनमार्गे सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या व्यापारात सहभागी असल्याचे सांगितले जाते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा