खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर हा ३ मार्च २०१५ पासून कॅनडाचा नागरिक होता, असा दावा कॅनडाच्या मंत्र्यांनी केला आहे. मात्र, निज्जर १९९७ मध्ये बनावट पासपोर्टच्या आधारे कॅनडामध्ये दाखल झाला होता. त्यानंतर त्याने कॅनडा सरकारकडे शरणार्थी म्हणून अर्ज केला होता. मात्र, कॅनडा सरकारने तो फेटाळून लावला होता. कॅनडाला पोहोचल्यानंतर ११ दिवसांतच त्याने एका कॅनडियन महिलेशी विवाह केला होता. त्यानंतर त्याने पुन्हा नागरिकत्व मागितले होते. मात्र, तो अर्जही कॅनडा सरकारने फेटाळून लावला होता.
या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून याचे उत्तर कॅनडा सरकार देण्यास टाळाटाळ करत आहे. पहिला प्रश्न म्हणजे १७ वर्षे हरदीपसिंग निज्जर कॅनडात बेकायदा वास्तव्य करत असताना तेथील सरकारने त्याच्यावर कारवाई का केली नाही? या दरम्यान त्याने अनेक परदेश दौरे केले, ते त्याने कोणत्या पासपोर्टवर केले? सर्वांत गंभीर बाब म्हणजे जेव्हा सन २०१५ मध्ये भारत सरकारने निज्जर याला फरार दहशतवादी घोषित करून त्याच्या विरोधात लूकआऊट नोटीस जाहीर केली होती, तेव्हाच त्याला कॅनडा सरकारने नागरिकत्व कसे काय दिले?
भारत सरकारने निज्जरला दहशतवादी घोषित करूनही, त्याच्याविरोधात पुरावे सादर करूनही कॅनडा सरकारने त्याचे प्रत्यार्पण का केले नाही? दोन्ही देशांमध्ये प्रत्यार्पण करार झालेला असूनही कॅनडा सरकारने या संदर्भात पाऊल का उचलले नाही? याचा अर्थ भारतातील दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना कॅनडा पाठबळ देते आहे, असा आरोप राजकीय विश्लेषक करत आहेत.
गेल्या वर्षी कॅनडामध्ये १५ हून अधिक भारतविरोधी घटना घडल्या. कॅनडामध्ये सद्यस्थितीत नऊ संघटना सक्रियपणे भारतात दुही पसरवण्याच्या कटामध्ये सहभागी आहेत. भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना धमकावत आहेत. या संघटनांची मुळे दहशतवाद, अमली पदार्थ आणि मानवी तस्करांशी जोडलेली आहेत.
हे ही वाचा:
लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर, ४५४ विरुद्ध २ मतांनी झाले संमत
शर्टाचे बटण उघडे ठेवल्यामुळे गुन्हा !
सुप्रिया सुळेंना नको आहे महिला आरक्षणाचा लाभ
आता खिचडी घोटाळ्यात गजानन कीर्तिकरांच्या मुलाचे नाव !
गँगस्टरचे आश्रयस्थान
भारतातील अनेक गुंडांचेही कॅनडा हे आश्रयस्थान ठरला आहे. पंजाब पोलिसांच्या मते, लखबीरसिंग उर्फ लांडा, गोल्डी बराड, चरणजीत सिंग उर्फ रिंकू रांधवा, अर्शदीप सिंग उर्फ अर्श डाला, रमणदीप सिंग उर्फ रमन जज, गुरपिंदर सिंग उर्फ बाबा डल्ला आणि सुखदुल सिंग उर्फ सुखा हे गुंड कॅनडामध्ये आश्रय घेऊन भारतात गुन्हेगारी कारवाया करत आहेत.