समाजवादी पक्षाचे खासदार शफिकार रेहमान बारक यांनी नवीन संसदेत इमारतीत नमाज अदा करण्यासाठी स्वतंत्र जागा देण्याची मागणी केल्यामुळे मंगळवारी गदारोळ माजला. प्रसारमाध्यमांशी बोलताना ९३ वर्षीय खासदारांनी नवीन संसदेत नमाज अदा करण्यासाठी स्वतंत्र जागा असावी, अशी मागणी केली.
‘नवीन संसद इमारतीतदेखील नमाज अदा करण्यासाठी जागा नाही. मुस्लिमधर्मीयांना नमाज अदा करताना ‘अल्ला अल्ला’ म्हणण्यासाठी नवी इमारतीत किमान जागा असणे गरेजेचे आहे. मात्र ते मुस्लिमांविरोधात द्वेष पसरवत असतात. तुम्हाला काय वाटतं, ते आमच्यासाठी जागा देतील?,’ असे बारक बोलताना दिसत आहेत. नवीन संसद इमारतीमधून कामकाज सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ही मागणी आली आहे.
हे ही वाचा:
काही देशांच्या संसदेत ५० टक्क्यांहून अधिक महिला
सुप्रिया सुळेंना नको आहे महिला आरक्षणाचा लाभ
शर्टाचे बटण उघडे ठेवल्यामुळे गुन्हा !
कॅनडाला भारताशी पंगा भारी पडणार; आर्थिक फटका बसण्याची शक्यता
मात्र समाजवादी पक्षाचे नेते बारक यांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांनी भारत हा कधीच हिंदू राष्ट्र नव्हता आणि कधी बनू शकणारही नाही, इस्लाम हाच खरा धर्म आहे, असा दावा केला होता. तसेच, ऑक्टोबर २०२२मध्येही शफीकुर रहमान बारक यांनी महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरख्याशिवाय फिरण्याची परवानगी दिल्यास पुरुषांमध्ये केवळ रानटीपणा आणि संभोग करण्याची इच्छा वाढेल, असे अजब वक्तव्य केले होते. तसेच, वंदे मातरम् म्हणणे हे इस्लाम धर्माच्या विरोधात असल्याचेही त्यांनी ठासून सांगितले होते. त्यांनी यापूर्वी कट्टर इस्लामी संघटना तालिबानींची भारताच्या स्वातंत्र्यसैनिकांशी तुलना केली होती. या त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, उत्तर प्रदेशमधील संभल जिल्ह्यात सिटिझन अमेंडमेंट ऍक्ट (सीएए)विरोधात झालेल्या हिंसक आंदोलनाशी संबंधित असल्याच्या आरोपावरूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.