23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरअर्थजगतकॅनडाला भारताशी पंगा भारी पडणार; आर्थिक फटका बसण्याची शक्यता

कॅनडाला भारताशी पंगा भारी पडणार; आर्थिक फटका बसण्याची शक्यता

दोन्ही देशांमधील राजकीय संबंध ताणले आहेत

Google News Follow

Related

कॅनडा आणि भारत या दोन्ही देशांमधील राजकीय संबंध सध्या कमालीचे ताणले गेले आहेत. बिघडलेल्या राजकीय संबंधाचा आता परिणाम उद्योग व्यवसाय करणाऱ्यांना होणार असल्याची शक्यता आहे. भारत आणि कॅनडा दरम्यान अनेक व्यवसायिक करार आहेत. अनेक भारतीय कंपन्या कॅनडामधून काम करतात. दोन्ही देशांमधील वादामुळे या कंपन्यांच्या माध्यमातून एकमेकांच्या देशात केलेल्या गुंतवणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यवहाराच्या बाबतीत कॅनडा नवव्या स्थानावर आहे. दोन्ही देशांमध्ये शैक्षणिक, औद्यागिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये कोट्यवधींचे करार आहेत. भारतीय कंपन्यांबरोबरच कॅनडाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कॅनडामध्ये कार्यरत असलेल्या भारतीय कंपन्यांची संख्या हजारोंमध्ये असून अनेक कॅनडीयन लोक या कंपन्यांमध्ये काम करतात. शिवाय या कंपन्यांच्या माध्यमातूनर परदेशी व्यवहार कॅनडामध्ये होत आहे. या कंपन्यांनी मोठा निधी कॅनडामध्ये गुंतवला आहे.

२०२३ च्या मे महिन्यामध्ये मध्ये ‘फ्रॉम इंडिया टू कॅनडा : इकनॉमिक इम्पॅक्ट अॅण्ड एगेजमेंट’ या नावाचा अहवाल जाहीर झाला होता. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल टोरंटोच्या दौऱ्यावर असताना हा अहवाल जारी करण्यात आला होता. या अहवालामधील आकडेवारीमधून श्रीलंका, बांग्लादेश, नेपाळ आणि आखाती देशांबरोबरच कॅनडासाठी भारत किती महत्त्वाचा आहे हे अधोरेखित करण्यात आले होते.

कॅनडामध्ये सुमारे ३० भारतीय कंपन्या असून त्यांची कोट्यवधींची उलाढाल आहे. या मोठ्या कंपन्यांनी कॅनडामध्ये ४० हजार ४४६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे याचा फटका कॅनडाला बसू शकतो.

हे ही वाचा:

गणपतीला जाणाऱ्या गाडीला समृद्धीवर अपघात, १ मृत्युमुखी

नागपूर विमानतळावर ८७ लाखांच्या सोन्यासह दोघांना अटक !

इंग्लंडमध्ये चेतेश्वर पुजारा एका सामन्यासाठी निलंबित !

अनंतनाग हल्ल्याचा मास्टरमाईंड उजैर खानचा खात्मा !

कॅनडामधील पेन्शन फंडांमध्ये भारताची ५५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपन्या कॅनडात कार्यरत आहेत. त्याशिवाय सॉफ्टवेअर, नौसर्गिक स्त्रोत, बँकिंग यासारख्या क्षेत्रांमध्येही कॅनडात भारतीय कंपन्या कार्यरत आहेत. इन्फोसिस, विप्रोसारख्या भारतीय कंपन्या कॅनडामधूनही कार्यरत आहेत. २०२२ च्या आकडेवारीनुसार व्यापाराच्या दृष्टीने कॅनडा हा भारताबरोबर आर्थिक व्यवहार करणाऱ्या पहिल्या दहा देशांमध्ये होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा