भारताच्या लष्कराची ताकद वाढणार असून आता पुन्हा एकदा केंद्र सरकारकडून सैन्य दलासाठी आधुनिक उपकरणे खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. आधुनिक उपकरणे खरेदीसाठी नऊ भांडवल अधिग्रहण प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे.
सशस्त्र दलासाठी संरक्षण संपादन परिषदेकडून (DAC) ४५ हजार कोटींची उपकरणे खरेदी करण्यासाठीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, १५ सप्टेंबर रोजी संरक्षण संपादन परिषदेची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सुमारे ४५ हजार कोटी रुपयांच्या नऊ भांडवली संपादन प्रस्तावांना आवश्यक मंजुरी देण्यात आली आहे.
आत्मनिर्भर भारत आणि मेड इन इंडिया या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला चालना देण्यासाठी सर्व उपकरणांची खरेदी भारतीय कंपन्यांकडून केली जाणार आहे.
हे ही वाचा :
गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच घ्यावी लागणार परवानगी
संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय
उद्धवजी दंगली कोण घडवतायत ते जरा बघा
कोणत्या शस्त्र खरेदीला मंजुरी?
चिलखती बहुउद्देशीय वाहने (LAMV) आणि एकात्मिक तेहळणी यंत्रणा आणि लक्ष्यीकरण प्रणाली (ISAT-S) च्या खरेदीसाठी मान्यता देण्यात आली आहे. लष्कराला वेगाने हालचाल करता यावी यासाठी, तसेच तोफखाना आणि रडारच्या तैनातीसाठी उच्च गतिशीलता वाहने (HMV) आणि गन टोइंग वाहनांच्या खरेदीच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली आहे. नौदलासाठी पुढील पिढीच्या सर्वेक्षण जहाजांच्या खरेदीलाही मान्यता दिली आहे. डॉर्नियर विमानात एव्हीओनिक अपग्रेडेशनचा समावेश असलेल्या भारतीय हवाई दलाच्या प्रस्तावांसाठी AON खरेदीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. तसेच, स्वदेशी बनावटीच्या ALH MK-IV हेलिकॉप्टरसाठी शक्तिशाली स्वदेशी शस्त्र म्हणून ध्रुवस्त्र शॉर्ट रेंज एअर-टू-सर्फेस क्षेपणास्त्राच्या खरेदीला मान्यता देण्यात आली आहे.