31 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषरश्मी ठाकरे रुग्णालयात दाखल

रश्मी ठाकरे रुग्णालयात दाखल

Google News Follow

Related

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना उपचारासाठी एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. २३ मार्च रोजी रश्मी ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर आज त्यांनी दक्षिण मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रश्मी ठाकरे यांना रुटीन तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं. पण आता त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं सांगितलं जात आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आदित्य ठाकरे यांनी स्वत:च ट्विटरवरुन ही माहिती दिली होती. त्यानंतर रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरच त्यांनी स्वत: क्वारंटाईन करुन घेतलं होतं. त्यानंतर आता रश्मी ठाकरे यांनी एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महत्वाची बाब म्हणजे ११ मार्च रोजी रश्मी ठाकरे यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता.

हे ही वाचा:

राज्यात कोरोनाचा थयथयाट, पण ठाकरे सरकार स्मारक उभारण्यात मग्न

शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी

महाराष्ट्राची परिस्थिती चिंताजनक… मुंबईत मिळत नाहीयेत रुग्णालयात खाटा, तर नागपपूरात ऑक्सिजनची कमतरता

परमबीर यांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आदित्य ठाकरे यांनी स्वत: २० मार्च रोजी ट्विटरवर याबाबत माहिती दिली होती. “माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी आणि चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या”, असं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं होतं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा