महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी छापे टाकल्यानंतर दक्षिण मुंबईतील लोकप्रिय बडेमिया हॉटेल बुधवारी सील करण्यात आले आहे. स्वच्छतेच्या तक्रारींवरून एफडीएच्या अधिकाऱ्यांनी हॉटेलवर छापा टाकला. छाप्यांदरम्यान अधिकाऱ्यांना हॉटेलच्या स्वयंपाकघरात झुरळ आणि उंदीर सापडले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अधिक तपासणी केल्यावर, अधिकाऱ्यांना असे आढळून आले की ७६ वर्षे जुने असलेल्या बडेमिया हॉटेलकडे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अंतर्गत परवाना देखील नाही. एफडीए ने बडेमिया हॉटेल व्यवस्थापनाला हॉटेलला टाळे ठोकण्याची नोटीस दिली.
हे ही वाचा:
अपघातात भारतीय विद्यार्थिनीच्या झालेल्या मृत्युनंतर अमेरिकन पोलिसांनी उडविली खिल्ली
धोतराला हात घालणाऱ्या पत्रकारांचा नाद नको रे बाबा..
शौर्याला सलाम: जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेल्या लष्करी अधिकाऱ्यांना श्रद्धांजली
दिल्लीतल्या ४५० पोलिसांना पंतप्रधानांकडून स्नेहभोजन
एफडीएच्या अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार वांद्रे येथील पापा पंचो दा ढाबा या ठिकाणी जेवणात उंदरी आढळून आल्यानंतर मुंबईसह राज्यातील बड्या हॉटेलचे स्वयंपाकघर तपासणी करण्यात येत आहे. बुधवारी कुलाब्यातील लोकप्रिय हॉटेल बडेमिया चे मुख्य स्वयंपाक तपासले असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि झुरळ उंदीर आणि इतर कीटकांचा मोठ्या प्रमाणात वावर आढळून आला आहे. तसेच हॉटेल कडे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अंतर्गत परवाना देखील नसल्यामुळे हॉटेलला नोटीस बजावून टाळे ठोकण्यात आले असल्याचे अधिकारी यांनी म्हटले आहे.