26 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरविशेषबिहारमध्ये बोट उलटून १८ विद्यार्थी बुडाले

बिहारमध्ये बोट उलटून १८ विद्यार्थी बुडाले

बागमती नदीत भीषण अपघात

Google News Follow

Related

बिहारमधील मुजफ्फरपूर येथे गुरुवार, १४ सप्टेंबर रोजी मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरलेली एक बोट नदीत उलटल्याची धक्कदायक आणि भीषण घटना घडली आहे. अपघातग्रस्त बोटीत ३४ विद्यार्थी असून त्यातील १८ विद्यार्थी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमुळे बिहारमध्ये खळबळ उडाली आहे.

बिहारमधील मुजफ्फरपूर येथील बागमती नदीत गुरुवारी सकाळी एक नाव विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. बागमती नदीतून जाताना अचानक ही बोट डळमळू लागली आणि काही अंतरावर गेल्यानंतर ही बोट विद्यार्थ्यांसह उलटली. या नदीवर वाहतुकीसाठी पूल बांधण्यात यावा अशी मागणी सुरू होती. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा मुद्दा चर्चेत राहिला होता, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे.

विशेष म्हणजे इतकी भीषण दुर्घटना होऊनही, घटनास्थळी मदत आणि बचावकार्य करणारी यंत्रणा पोहोचण्यास तासापेक्षा अधिक अवधी लागला. त्यामुळे मुजफ्फरपूरमधील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाची यंत्रणा पोहचेपर्यंत स्थानिकांनी बचावकार्याला सुरुवात केली होती. सध्या एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून शोध आणि बचावकार्य सुरु आहे. १६ विद्यार्थ्यांना वाचविण्यात यश आले असून १८ विद्यार्थी अद्याप बेपत्ता आहेत.

हे ही वाचा:

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ देशभरातील पाच शहरांत प्रदर्शित करणार

मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध

‘इंडिया’ गट काही टीव्ही अँकरवर बहिष्कार घालणार

बिहारमधील ‘वैशाली’ लोकशाही उत्सवात प्रियदर्शी दत्तांच्या पुस्तकाचे प्रकाशन

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे. “मुझफ्फरपूरचे जिल्हाधिकारी घटनेची चौकशी करत आहेत. या अपघातात बाधित झालेल्या कुटुंबांना सरकारकडून मदत दिली जाईल,” असं नितीश कुमार म्हणाले. दरम्यान, त्यांचा गुरुवारी मुजफ्फरपूर येथे दौरा असून अशा परिस्थितीत दौऱ्याच्या ठिकाणी सुरक्षा अधिक कठोर करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा