जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे झालेल्या चकमकीत एका जवानाचे रक्षण करताना केंट या सहा वर्षीय भारतीय लष्कराच्या कुत्र्याचा मृत्यू झाला. सैनिकांच्या एका तुकडीसोबत हा कुत्रा जात असताना नारला गावात गोळीबार सुरू झाला. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली.
केंट असे या कुत्र्याचे नाव आहे. केंट ही २१व्या आर्मी डॉग युनिटची महिला लॅब्राडोर जातीची कुत्री होती. तिच्या हँडलरला वाचवण्याच्या प्रयत्नात तिने स्वत:चा जीव दिला. ‘ऑपरेशन सुजलीगाला’मध्ये आर्मी डॉग केंट आघाडीवर होती. दहशतवादी ज्या मार्गाने पळून गेले, त्या मार्गावरून जात त्यांचा शोध घेणाऱ्या सैनिकांच्या एका तुकडीचे नेतृत्व केंट करत होती. मात्र या तुकडीच्या मागावर असणाऱ्या दहशतवाद्यांनी या तुकडीवर जोरदार गोळीबार सुरू केला. त्याचवेळी भारताच्या महान पंरपरेला जागून आपल्या हँडरला वाचवण्याच्या प्रयत्नात स्वत:चा जीव धोक्यात घालून केंट धारातीर्थी पडली,’’ असे संरक्षण प्रवक्त्याने सांगितले.
हे ही वाचा:
संशयास्पद चिनी बॅगवरून १२ तासांचे नाट्य
डीएमकेने स्पष्टच सांगितले की, सनातन धर्म नष्ट करणे हाच इंडी आघाडीचा उद्देश
ऋषी सुनक यांनी एकनाथ शिंदेंना भन्नाट किस्सा ऐकवला!
उद्धव ठाकरे हे केवळ मनोरंजन करणारे ‘विदूषक’ !
राजौरी येथे झालेल्या चकमकीत एक संशयित पाकिस्तानी दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. मात्र यात लष्कराचा एक जवान शहीद झाला. याशिवाय, गोळीबारात दोन लष्करी जवानांसह एक विशेष पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. नारला गावात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली, असे जम्मू झोनचे अतिरिक्त पोलिस महासंचालक मुकेश सिंग यांनी सांगितले. केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनीही ‘एक्स’वर केंट हिला श्रद्धांजली वाहिली.