26 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरविशेषवंचित समाजाचे डॉ.संजय भोसले यांचा भाजपात प्रवेश !

वंचित समाजाचे डॉ.संजय भोसले यांचा भाजपात प्रवेश !

वंचित समाजाच्या कल्याणासाठी भाजपा कायम पाठीशी,चंद्रशेखर बावनकुळे

Google News Follow

Related

वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ.संजय भोसले यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी पक्षात आज प्रवेश केला.

भारतीय जनता पार्टी पक्षात सध्या अनेक बड्या नेत्यांसह राज्यातील विविध संघटनांचा समावेश होत आहे. १२ सप्टेंबर रोजी मुंबईतील भाजप पक्ष कार्यालयात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ.संजय भोसले यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला.डॉ. संजय भोसले हे वंचित आघाडीचे नेते असून त्यांनी २०१९ मध्ये दक्षिण मध्य मुंबई मधून लोकसभेसाठी निवडणूक लढविली होती.पंतप्रधान मोदींचे काम पाहून अनेक नेते, कार्यकर्ते भाजप पक्षात सामील होत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.आज झालेल्या पक्षप्रवेशादरम्यान ते बोलत होते. तसेच सनातन धर्माचा अपमान करण्याऱ्या स्टॅलिनच्या वक्तव्यावर ठाकरे आजूनही काही बोलले नाहीत म्हणजे ते त्यांना मान्य असेल असे समजावे लागेल तसे नसल्यास त्यांनी विरोधी पक्षाच्या इंडिया पक्षातून बाहेर पडावे, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

‘मत्स्य ६०००’ च्या साथीने भारत समुद्राच्या उदरातील रहस्य उलगडणार

१०० कुटुंबांचं हसतं खेळतं गाव भुईसपाट

जी-२०च्या यशस्वी आयोजनाबद्दल भारताचे जगभरातून कौतुक

पवार कुणबी व्हायला तयार आहेत का?

महाविकास आघाडीवाले काही जण घर कोंबडे होते, जेव्हा हे मंत्री असताना घरातून कधी बाहेरचं पडले नाहीत, कोणत्या कार्यकर्त्याला,आमदाराला, खासदाराला भेटले नाहीत त्यामुळे त्यांची आता ‘हम दो हमारे दो’ अशी परिस्थिती झाली असल्याचे नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला. उबाठा गटाच्या विमानाचे वैमानिक संजय राऊत हे असल्याने त्यांचे विमान पडत असल्याचे कळतांच त्यांच्या गटातील अनेक नेते भाजपा पक्षात आले कारण पंतप्रधान मोदींचे विमान पडणार नाही तसेच कोठेही सुरक्षितपणे उतरू शकते, अशी टिप्पणी ठाकरे गटावर बावनकुळे यांनी केली.उद्धव ठाकरे यांची सध्याची परिस्थिती म्हणजे, ‘एक दिले के तुकडे हजार, कोई यहा गिरा कोई वहा गिरा’ तसेच शरद पवारांनी आगामी काळातील निवडणूक लढवण्यासाठी ठाकरे गटाला दोन जागा दिल्या तरी ते ठाकरेंना मान्य करावे लागेल, ते पुढे म्हणाले.

 

 

बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत शक्तिशाली देश बनत असून आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक एक पाऊल आत्मविश्वासाने टाकत आहे. पंतप्रधान मोदी आणि विकासाचा ध्यास असलेले राज्यातील नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षांतील कार्यकर्त्यांचा ओढा भाजपाकडे वाढला आहे.

 

महायुती सरकारच्या माध्यमातून वंचित समाजाचे प्रश्न मार्गी लावले जातील तसेच घडशी समाजाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येईल असेही बावनकुळे यांनी नमुद केलं.वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण भाजपामध्ये प्रवेश केल्याचे भोसले यांनी यावेळी सांगितले . विरोधी पक्षीयांनी भाजपा बद्दल पसरवलेले गैरसमज दूर करण्याचा तसेच मोदी सरकार व महायुती सरकारच्या योजना दुर्बल घटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू असेही भोसले यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा