भारताचा तडाखेबंद फलंदाज विराट कोहलीने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत १३ हजार धावांचा विक्रम केला आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा १३ हजार धावा वेगाने पूर्ण करण्याचा वनडे क्रिकेटमधील विक्रम मोडीत काढून विराटने ही कामगिरी केली आहे. त्याचे हे ४७वे वनडे शतकही ठरले. वनडे क्रिकेटमध्ये १३ हजार धावा वेगाने करणारा विराट हा आता पहिला फलंदाज ठरला आहे.
भारताचा माजी कर्णधार राहिलेल्या विराटने पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोर सामन्याच्या राखीव दिवशी ही कामगिरी केली. आधी पावसामुळे हा सामना राखीव दिवशी ढकलण्यात आला. त्यात विराटला ही कामगिरी करण्याची संधी मिळाली. त्याने प्रथमच ५५ चेंडूंत आपले अर्धशतक ठोकले आणि नंतर शतकपूर्तीसाठी आणखी २९ चेंडू खेळून त्याने ४७व्या वनडे शतकाची नोंद केली.
हे ही वाचा:
संजय बियाणींवर गोळ्या झाडणारा दीपक रांगा पोलिसांच्या ताब्यात
चंद्राबाबू नायडू १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत
भारतातील जी- २० मध्ये विक्रमी कामगिरी; ११२ प्रस्ताव संमत
‘मोदीजी, आम्हाला पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त करा’
विराटने आतापर्यंत ८ हजार, ९ हजार, १० हजार, ११ हजार आणि १२ हजार धावा करताना सर्वाधिक वेगवान धावा करणारा फलंदाज म्हणून नाव नोंदविले आहे. आता १३ हजार धावा सर्वाधिक वेगाने करणारा फलंदाज म्हणून त्याच्या नावाची नोंद झाली आहे.
सचिन तेंडुलकरपेक्षा विराटने कमी डावांत या १३ हजार धावा केलेल्या आहेत. आता विराटला सचिन तेंडुलकरच्या वनडे शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी आणखी दोन शतकांची गरज आहे. आणखी एक शतक ठोकल्यानंतर त्याच्या खात्यात ५० शतके जमा होतील आणि तो सचिनला त्याबाबतीत मागे टाकेल.
विराट कोहलीच्या या शतकामुळे भारताने २ बाद ३५६ धावापर्यंत मजल मारली.या सामन्याच्या आधी कोहलीच्या खात्यात १२९०२ धावा होत्या. त्यावेळी त्याला ९८ धावांची गरज होती. रविवारी जो अर्धवट सामना झाला त्यात त्याने ८ धावा केल्या होत्या. त्यावेळी पावसामुळे खेळ थांबवावा लागला. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी त्याने बहारदार खेळ करत आपली शतकी खेळी साकारली.