शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांनी राजीनामा दिला आहे. बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरेंना व्हॉट्सअॅपद्वारे राजीनामा पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.भाऊसाहेब वाकचौरे यांना लोकसभेचं तिकीट मिळणार असल्याने बबनराव घोलप नाराज असल्याची माहिती.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातून अनेक नेते बाहेर पडत असल्याने ठाकरेंच्या पक्षाला उतरती कळा लागल्याचे दिसत आहे.तर दुसरीकडे पक्षाच्या एकजुटीसाठी उद्धव ठाकरे राज्यभर दौरा करत आहेत.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख ठाकरे आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत.मात्र, दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप यांनी राजीनामा देत ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बनराव घोलप यांनी उद्धव ठाकरेंना व्हॉट्सअॅपद्वारे राजीनामा दिला आहे.
हे ही वाचा:
४६ बालकांवर होणार मोफत हृदय शस्त्रक्रिया
नंदुरबारला आता आंतरराष्ट्रीय दर्जाची आदिवासी क्रीडा प्रबोधिनी
हिंदू असल्याचा आपल्याला अभिमान
मिर्चीचा ठेचा आणि भाकरी ठाकरेंना पचेल काय ?
बबनराव घोलप हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मानले जातात.बबन घोलप हे देवळाली मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून येत माजी मंत्री आहेत.सध्या घोलप हे ठाकरेंच्या पक्षात नाराज असल्याचे बोलले जात होते.कारण शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी बबनराव घोलप यांना लोकसभेच्या उमेदवारीचे आश्वासन दिले होते. घोलप यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघात संपर्क प्रमुख नेमून नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या उद्धव यांनी सूचनादिल्या होत्या. मात्र उद्धव ठाकरे यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीवर परस्पर शिक्कामोर्तब केल्याने बबनराव घोलप अस्वस्थ होते. यानंतर बबनराव घोलप यांनी मातोश्रीवर धाव घेतली होती. उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली होती. तसंच वाकचौरे यांच्या संभाव्य उमेदवारीला देखील विरोध केला होता.त्यामुळे या नाराजीतूनच त्यांनी राजीनामा दिला असावा असं म्हटलं जात आहे. दरम्यान, बबनराव घोलप सध्या आऊट ऑफ रेंज आहेत.