31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामाफेसबुकवर जमली गट्टी, शिक्षिकेला बसला १२ लाखांचा फटका !

फेसबुकवर जमली गट्टी, शिक्षिकेला बसला १२ लाखांचा फटका !

परदेशातून गिफ्ट पाठवण्याच्या बहाण्याने केली फसवणूक

Google News Follow

Related

गोंदियातील एका शिक्षिकेची १२ लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली.फेसबुकवर ओळख झालेल्या तरुणाने गिफ्ट पाठवतो असं म्हणतं शिक्षिकेला तब्बल १२ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा घातला आहे.

ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत.सध्याच्या तरुण-पिढी सोबत इतरही सोशल मीडियामध्ये गुंतलेले आहेत.सोशल मिडिआचा वापर चांगल्या प्रकारे करता येतो, मात्र यामधून फसवणूकही होऊ शकते याची खबरदारी बाळगली पाहिजे नाहीतर तुमचे खाते रिकामे झाले म्हणून समजा. तशीच एक फसवणुकीची घटना गोंदिया जिल्ह्यात घडली.फेसबुकवर ओळख निर्माण करून एका तरुणाने शिक्षिकेला चांगलाच गंडा घातला आहे. गोंदिया जिल्यातील
गोरेगाव तालुक्याच्या चिचगावटोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिकेची फसवणूक झाली आहे. या संपूर्ण प्रकरणात आजून तिघे जण सामील होते.

हेही वाचा :

चार वर्षात आर्थिक गुन्हेगारांकडून ११.८ अब्ज डॉलर्सची मालमत्ता जप्त

पारशी समुदायाचा उगम मध्य पूर्व आणि दक्षिण आशियाईतला

देशभरातील उत्पादक जगभरातील नेत्यांना सांगणार ‘मिलेट्स’ची यशोगाथा

जी- २० साठी आलेल्या परदेशी पाहुण्यांना ASK G.I.T.A. देणार प्रश्नांची उत्तरे

प्रथमतः फेसबुकवर ओळख निर्माण झालेल्या जॅक्सन जेम्स नामक व्यक्तीने माझा वाढदिवस असून मी आपणास गिफ्ट पाठवणार असल्याचे सांगत शिक्षिकेकडून तिच्या घरचा पत्ता मागवला आणि त्या पत्त्यावर गिफ्ट पाठवल्याचं नाटक केलं. पहिल्यांदा शिक्षिकेकडून कस्टम क्लिअरन्स चार्जेसच्या नावावर ७५ हजार रुपये मागितले. त्यानंतर नो-ड्रग्ज सर्टिफिकेट आणि नो-टेररिस्ट सर्टिफिकेटकरता ७ लाख ६० हजार रुपये पाठवण्यास सांगितले. परंतु आपल्याकडे पैसे कमी असल्याचे सांगत शिक्षिकेने ६ लाख ६० हजार रुपये पाठवले. त्यानंतर अदनान मोहिंदर नावाच्या व्यक्ती शिक्षिकेला व्हॉट्सअॅपवर मेसेज करुन तुमच्या पार्सलमध्ये अतिशय महागड्या वस्तू आहेत.

 

त्यासाठी तुम्हाला त्या वस्तूंच्या किमतीच्या १० टक्के म्हणजेच १५ लाख ४५ हजार रुपये चार्जेस पेड करावे लागतील असं सांगितलं. त्यानंतर शिक्षिकेने १४ जून रोजी २ लाख ३० हजार आणि १५ जून रोजी २ लाख ७० हजार रुपये चेकद्वारे अदनान मोहिंदरने पाठवलेल्या अकाऊंटवर पाठवले. असे एकूण १२ लाख ३५ हजार ६०० रुपये त्यांच्याकडून उकळून शिक्षिकेची फसवणूक केली.शिक्षिकेला फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने गोरेगाव पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी भादंविच्या कलम ४२०, ३४ सह कलम ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास गोरेगाव पोलीस करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा