28 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरविशेषआयआयटीचे संचालक म्हणतात मांसाहारामुळे हिमाचलमध्ये ढगफुटी

आयआयटीचे संचालक म्हणतात मांसाहारामुळे हिमाचलमध्ये ढगफुटी

आयआयटी मंडीच्या संचालकांचा अजब दावा

Google News Follow

Related

आयआयटी मंडीच्या संचालकांनी हिमाचलमधील भूस्खलनाबद्दल अजब विधान केले आहे. लोक मांसाहारी झाल्याने हिमाचलमध्ये ढगफुटी झाली असा अजब दावा आयआयटी मंडीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा यांनी केला आहे. यंदा हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी आणि भूस्खलनामुळे मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. मात्र, त्याचा संबंध आयआयटीच्या संचालकांनी अन्नाशी जोडल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आयआयटी मंडीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा यांनी विद्यार्थ्यांना मांस न खाण्याची शपथ घ्या असं आवाहन केलं आहे. मांसाहारासाठी प्राण्यांची क्रौर्याने हत्या केली जाते. त्याच क्रौर्यामुळे हिमाचल प्रदेशात भूस्खलन आणि ढगफुटीच्या घटना घडत आहेत, असा अजब दावा बेहरा यांनी केला. त्यांच्या या अजब वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

हे ही वाचा:

शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ महाराष्ट्रात परतणार

मोबाईल न दिल्यानं तरुणाची हत्या !

८ सप्टेंबरला काय होणार? धक्कातंत्राचा विरोधकांना धसका

शाहरूखच्या ‘जवान’ चित्रपटामुळे चाहत्यांमध्ये जल्लोष

“आपण हिमाचल प्रदेशात राहतो, जर इथले लोक मांसाहार करत राहिले तर हिमाचल प्रदेशात भूस्खलनाच्या आणखी घटना घडतील. तुम्ही निष्पाप प्राण्यांची हत्या करत आहात. त्याचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांशी संबंध आहे. तुम्ही ते पाहू शकत नाही पण तो परिणाम होतोच,” असं बेहरा म्हणत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हिमाचल प्रदेशात सातत्याने होणारं भूस्खलन, ढगफुटी आणि इतर ज्या नैसर्गिक समस्या येत आहेत ते सगळे प्राण्यांवरच्या क्रूरतेचे परिणाम आहेत. लोक मांसाहार करतात आणि अशा समस्या त्यामुळे ओढवतात. चांगला माणूस होण्यासाठी लोकांनी मांस खाणे बंद करायला हवं असं त्यांनी म्हटलं असून विद्यार्थ्यांना मांस न खाण्याची शपथ घ्या असंही आवाहन केलं आहे. लक्ष्मीधर बेहरा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा