तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर डीएमके खासदार ए. राजा यांनी, सनातन धर्माची तुलना HIV बरोबर केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला आहे.
ए राजा या वादावर बुधवारी बोलले की, “उदयनिधी या संपूर्ण वादावर जे काही बोलले, ते फार कमी आहे. त्यांनी फक्त मलेरिया आणि डेंग्यु म्हटल आहे. समाजात घृणास्पद म्हटलं जातं, असा हा आजार नाही. त्यांनी सनातनची तुलना HIV बरोबर केली. समाजासाठी सनातन असच काम करतं” असं ए राजा म्हणाले. ए.राजा यांनी सनातन धर्मावरुन थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना डिबेटच आव्हानही दिलं आहे.
ए राजा यांच्या वक्तव्यावर भाजपाने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. “उदयनिधी नंतर आता ए राजा सनातन धर्माला कमी लेखत आहेत. सनातन धर्माचा पालन करणाऱ्या हे देशातील ८० टक्के लोकांवर निशाणा साधण्यासारखे आहे. काँग्रेस नेतृत्वाखालील INDIA आघाडीचे हेच सत्य आहे. हिंदुंना कमीपणा दाखवून आपण निवडणूका जिंकू शकतो असं त्यांना वाटतं,” असे भाजपा नेते अमित मालवीय म्हणाले.
उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवार, २ सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की, “सनातन धर्म हा समानता आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचे उच्चाटन केलं जायला हवं. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध केला जाऊ कत नाही. त्यांचं उच्चाटनच केलं जायला हव. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही व्हायला हवं.”
हे ही वाचा:
नव्या तंत्रज्ञानासह जपानचे चांद्रयान अवकाशात झेपावले
स्माईल प्लीज! आदित्य एल- १ ने पाठवला पहिला सेल्फी
‘भारत’मुळे I.N.D.I.A.ला फुटला घाम
ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर बर्मिगहॅम दिवाळखोर म्हणून घोषित
उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचे मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी समर्थन केले होते. त्यामुळे या दोघांच्याही अडचणीत आता वाढ झाली आहे. वकील हर्ष गुप्ता आणि रामसिंग लोधी यांनी उदयनिधी आणि प्रियांक खरगे यांच्याविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीवरून दोघांवर मंगळवारी उत्तर प्रदेशातील रामपूर येथील सिव्हिल लायन्स पोलिस ठाण्यामध्ये आयपीसीच्या कलम २९५ ए (धार्मिक भावना भडकवण्यासाठी हेतुपुरस्सर आणि दुर्भावनापूर्ण कृत्ये) आणि १५३ ए (विविध धार्मिक गटांमधील वैर वाढवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.