अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या बांधकामात अडथळा ठरणारी रहिवासी आणि व्यावसायिक स्वरूपाची २८ बांधकामे निष्कासित करण्याची कार्यवाही महानगरपालिकेच्या के. पूर्व विभागामार्फत पार पाडण्यात आली आहे. सध्या महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत याठिकाणी विविध टप्प्यात काम सुरू आहे. त्यात कामांपैकी एका कामामध्ये क्रेन उभारणीसाठी काही बांधकामे निष्कासित करण्याची गरज निर्माण झाली होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱया महत्वाच्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम वेगाने व्हावे, यासाठी आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. या पूलाची किमान एक मार्गिक सुरू करण्यासाठी पालिकेच्या पूल विभागाची यंत्रणा याठिकाणी दिवसरात्र काम करत आहे. गर्डरच्या कामासाठी विभागाच्या माध्यमातून बांधकाम निष्कासन कारवाई सूचना के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त मनिष वळंजू यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
हेही वाचा..
‘भारत उत्पादनाचे नवीन केंद्र असेल’
दहीहंडीच्या दिवशी ढगांचे थर आणि वर्षोल्हास
पंतप्रधानांची ‘सनातन धर्मा’च्या संरक्षणाची हाक
‘भारत’मुळे I.N.D.I.A.ला फुटला घाम
गोखले पुलासाठी लागणाऱया गर्डरचे सुटे भाग हे ऑगस्ट महिन्यात अंबाला येथून मुंबईत दाखल झाले आहेत. पहिल्या टप्प्यातील गर्डरचे सर्व सुटे भाग अंधेरी येथे दाखल झाले आहेत. पुलाच्या कामाअंतर्गत रेल्वेच्या भागात टाकण्यात येणाऱया गर्डरसाठी क्रेनचा वापर करण्यात येणार आहे.