30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरविशेषविजयाचे गणितच न समजल्याने अफगाणिस्तानच्या हातून सामना गेला!

विजयाचे गणितच न समजल्याने अफगाणिस्तानच्या हातून सामना गेला!

श्रीलंकेने २ धावांनी सामना जिंकत सुपर ४ मध्ये केला प्रवेश

Google News Follow

Related

आशिया कपच्या सामन्यात अफगाणिस्तान क्रिकेट संघाला अवघ्या २ धावांनी पराभव पत्करावा लागला पण त्यांना सामना जिंकण्यासाठी आवश्यक असलेले गणितच माहीत नसल्यामुळे त्यांना हार मानावी लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. आशिया कप क्रिकेट स्पर्धेत निर्धारित २९२ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी त्यांच्याकडे ३७.१ पेक्षा अधिक षटके होती पण त्यांना पुरेशी माहिती न मिळाल्याने त्यांना दुर्दैवाने पराभव पत्करावा लागला.

 

 

या स्पर्धेच्या सुपर ४ गटात जाण्याची संधी हुकली. अफगाणिस्तानचे प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट म्हणाले की आम्हाला हे गणितच ठाऊक नव्हते. आम्हाला केवळ हे सांगण्यात आले की, ३७.१ षटकात निर्धारित धावा करायच्या आहेत. पण ३८.१ षटकात २९५ किंवा २९७ केल्या तरी आम्ही जिंकू शकतो हे आम्हाला कुणी सांगितले नाही.

 

 

जेव्हा श्रीलंकेने २९१ धावा केल्या तेव्हा ३७.१ षटकात २९२ धावा कराव्या लागतील एवढेच समोर आले होते. अफगाणिस्तान जेव्हा २८९ धावांवर पोहोचला तेव्हा षटकार मारून त्यांना २९५ धावा करता आल्या असत्या. पण त्यांच्या अंतिम धावसंख्येनुसार रनरेट पाहून ते विजयी झालेत अथवा नाही हे ठरवता आले असते. त्यावेळी त्यांना २९७ धावा कराव्या लागल्या असत्या, पण त्यासाठी त्यांना आणखी षटकही मिळाले असते आणि ३८.१ षटकांत ते ही धावसंख्या गाठू शकले असते. जर अफगाणिस्तानने ३७.२ षटकांत २९३, ३७.३ षटकांत २९४, ३७.५ षटकांत २९५, ३८ षटकांत २९६ किंवा ३८.१ षटकांत २९७ धावा केल्या असत्या तरी ते जिंकू शकले असते आणि सुपर ४ मध्ये प्रवेश करू शकले असते.

हे ही वाचा:

‘कुछ डरे हुवे लोग…’ फडणवीसांना दम देतायत!

पुढील आठवडाभर राज्यात पावसाचा अंदाज, अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य

एक कोटीचे इनाम जिंकल्यावर पंजाबच्या जसकरणला अमिताभनी मिठीच मारली!

सनातन धर्माबद्दल टिप्पणी प्रकरणी उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गेंविरोधात गुन्हा

 

जेव्हा अफगाणिस्तानच्या मुजीब रहमान खेळत होता तेव्हा त्यांना एका चेंडूत ३ धावांची गरज होती. तेव्हा त्याने चौकार मारण्याची किंवा पुढील पाच चेंडूंत षटकार मारण्याची संधी होती. पण अफगाणिस्तानला विजयाचे गणितच माहीत नसल्यामुळे मुजीबने मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात श्रीलंकेच्या क्षेत्ररक्षकाकडे झेल दिला आणि समोर उभा असलेला रशीद खान निराश होऊन खालीच गुडघ्यांवर बसला. त्यानंतरही अफगाणिस्तानला संधी होती. ११वा फलंदाज फझलहक फारुकी याने पुढचा फुलटॉस चेंडू खेळून काढला. कदाचित पुढील पाच चेंडू तो खेळून काढणार होता. कदाचित पुढच्या षटकात रशिद खान सामना जिंकून देईल असे त्याला वाटले होते. पण चौथ्या चेंडूवर तो पायचीत झाला. श्रीलंकेचा संघ २ धावांनी सामना जिंकला. श्रीलंकेचा संघ सुपर फोरसाठी पात्र ठरला.

 

 

मग या सगळ्या घोळाला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाल्यावर असे लक्षात आले की सामनाधिकाऱ्यांनी अफगाणिस्तानला हे गणित समजावून सांगायला हवे होते. त्यामुळे त्यांचा यात मुख्य दोष आहे, असे म्हटले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा