गणपती उत्सवासाठी कोकणात जायचंय? तिकीट मिळत नाहीए? गाड्या फूल आहेत? रिझर्व्हेश होत नाहीए? तर, काळजी करू नका. आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव साजरा करण्यासाठी आता रेल्वे तुम्हाला कोकणात घेऊन जाणार आहे. कोकण रेल्वेने पनवेलपासून चिपळूणपर्यंतचा प्रवास केवळ माणसी ५० रुपयात देण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी तुम्हाला काय करायचे आहे. तर तुम्ही थेट तिकीट काउण्टरवर जा आणि पनवेल ते चिपळूण मार्गावर धावणाऱ्या डीएमयू रेल्वेचे तिकीट काढा. या गाडीला १२ डबे असतील. त्यामध्ये एक पहिल्या वर्गाचा व एक महिलांचा डबा असणार आहे.
हेही वाचा :
तब्बल ६१ हजारवेळा विजा कडाडल्या; ओदिशात १२ मृ्त्युमुखी
सूर्याच्या सर्वात वरच्या ‘करोना’ स्तराचे तापमान २० लाख डिग्री
चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणाचे काऊंटडाऊन सांगणारा आवाज हरपला
पंतप्रधान मोदी ऑन ड्युटी; नऊ वर्षात एकही सुट्टी नाही
ही गाडी सकाळी ११ वाजून १० मिनीटांनी पनवेलहून सुटेल. पुढे रोहा, कोलाड, इंदापूर,माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सपेवामने, करंजाडी, विनहेरे, दिवानखावटी, खेड, अंजनी, चिपळूण आदी ठिकाणांहून प्रवास करीत त्याच दिवशी संध्याकाळी चिपळूणला ४ वाजता पोहोचेल. चिपळूणहून ही गाडी सायंकाळी. ५.३० वाजता सुटून पनवेलला रात्री १०.३० वाजता पोहोचेल. मात्र हे लक्षात घ्या, की ही सेवा केवळ ३० सप्टेंबरपर्यंतच असणार आहे.
तेव्हा संधी दवडू नका. त्वरा करा आणि थेट आपल्या गावी पोहोचा आणि बापाच्या उत्सवात उत्साहाने सहभागी होण्याचा आनंद लुटा.