इस्रोच्या वैज्ञानिक, चांद्रयान-३ मोहिमेच्या रॉकेट प्रक्षेपणाच्या काऊंटडाऊनमागील आवाज हरपला आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञ वलरमथी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
श्रीहरिकोटा येथे रॉकेट प्रक्षेपणादरम्यान काऊंटडाऊनची गणती करताना त्यांचा आवाज अवघ्या जगाने ऐकला होता. त्यांनी ‘चांद्रयान-३’ मोहिमेच्या रॉकेट प्रक्षेपणासाठी केलेले काऊंटडाऊन हेच त्यांचे अखेरचे ठरले. १४ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान -३ प्रक्षेपित करण्यात आले होते.
२३ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ चे लँडर मॉड्यूल आणि त्यातील विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर – हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. हा पराक्रम पूर्ण करणारा भारत हा केवळ चौथा देश ठरला. तर, चंद्राच्या दक्षिण धृवावर उतरणारा पहिलाच देश ठरला.
हे ही वाचा:
‘वंदे भारत’ चीन सीमेपर्यंत धावणार
सूर्याच्या सर्वात वरच्या ‘करोना’ स्तराचे तापमान २० लाख डिग्री
बलात्कारी, मारेकरी मुलाविरुद्ध आईनेच साक्ष दिली; झाली जन्मठेपेची शिक्षा
पवईत एअर होस्टेसची हत्या, फ्लॅटमध्ये मिळाला मृतदेह
इस्रोने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, एक चांद्रदिवसासाठी प्रज्ञान रोव्हर काम करणार होते. एक चांद्रदिवस म्हणजे पृथ्वीवरील १४ दिवस. हे दिवस संपल्यामुळे आता प्रज्ञान रोव्हरची कार्यप्रणाली बंद झाली आहे. चंद्रावर आता सूर्यास्त झाल्यामुळे प्रज्ञान रोव्हर आता कोणतेही कार्य करू शकणार नाही. पृथ्वीवरच्या १४ दिवसांनंतर म्हणजेच एका चांद्रदिवसानंतर जेव्हा चंद्रावर सूर्योदय होईल, तेव्हा प्रज्ञान रोव्हर पुन्हा काम करू लागेल, असा विश्वास इस्रोच्या वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे.
रोव्हर हे अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (एपीएएस) आणि लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप (एलआयबीएस) या दोन पेलोडसह सुसज्ज आहे. लँडरद्वारे पृथ्वीवर डेटा प्रसारित करणारे पेलोड्स बंद आहेत. प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर मौल्यवान वैज्ञानिक डेटा गोळा करण्यासाठी एकत्रितपणे काम करत होते. एपीएक्सएस आणि एलआयबीएस पेलोड्स चंद्राची माती आणि खडकांच्या मूलभूत आणि खनिज रचनांचे विश्लेषण करण्यासाठी डिझाइन केले आहेत. जर प्रज्ञान रोव्हर पुन्हा कार्यान्वित झाले नाही तर, ते चंद्रावर भारताचे चंद्र राजदूत म्हणून कायमचे मुक्कामाला राहतील.