एका विधवेच्या हत्येच्या खटल्यादरम्यान आईने तिच्या स्वतःच्या मुलाविरुद्ध दिलेली साक्ष त्याच्या आणि त्याच्या मित्राला दोषी ठरवण्यात महत्त्वपूर्ण ठरली. त्रिपुराच्या सेपाहिजाला येथील जिल्हा न्यायालयात ही घटना घडली.
बिशालगड नगरपरिषदेतील सफाई कामगार कृष्णा दास या ५५ वर्षीय विधवा महिलेच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने सुमन दास (२४) आणि चंदन दास (२६) यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा गुन्हा एप्रिल २०२० मध्ये घडला. सिपाहिजाला येथे एकट्या राहणाऱ्या कृष्णा दास या विधवा महिलेला क्रूरपणे मारहाण करून ठार मारण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही दोषींनी तिचा गळा दाबण्यापूर्वी तिच्या घरातच तिच्यावर बलात्कार केला. नंतर त्यांनी तिचा मृतदेह एका पडक्या विहिरीत फेकून दिला. मृतदेह सापडल्यानंतर, तिच्या सुनेने तक्रार दाखल केली होती.
हे ही वाचा:
आनंद साजरा करण्यासाठी बुमराह परतला मायदेशी
‘वंदे भारत’ चीन सीमेपर्यंत धावणार
पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात रॉकेटला गती
लंडनमधील महाराष्ट्र भवनच्या वास्तूत येताना वेगळाच आनंद वाटतो
पोलिसांनी तपासादरम्यान, दोन्ही आरोपींना अटक केली आणि त्यांच्या कबुलीजबाबांच्या आधारे आरोपपत्र दाखल करण्यात आले. पोलिसांनी सुमनच्या आईसह २५ जणांचे जबाब नोंदवले, ज्यांनी तिच्या मुलाविरुद्ध साक्ष दिली. ‘सुमनची आई नमिता दास यांनी तिच्या दोषी मुलाला आणि त्याच्या मित्राला शिक्षा व्हावी यासाठी योग्य बाजू घेतल्याने प्रकरणाला कलाटणी मिळाली,’ असे जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त सरकारी वकील गौतम गिरी यांनी सांगितले. नमिताने तिच्या साक्षीदरम्यान तिच्या मुलाला फाशीची शिक्षा देण्याची मागणीही केली होती.