28 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरराजकारण'सनातन धर्म मिटवा' म्हणणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनला महाराष्ट्रात येण्यास बंदी घाला

‘सनातन धर्म मिटवा’ म्हणणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनला महाराष्ट्रात येण्यास बंदी घाला

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मागणी

Google News Follow

Related

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिनने सनातन धर्माची तुलना मच्छर, डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनासोबत करून त्याने कोट्यावधी हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान केला आहे. उदयनिधी स्टॅलिन जोवर त्याचे विधान मागे घेत नाही तोपर्यंत त्याला महाराष्ट्रात येण्यापासून बंदी घालावी अशी मागणी मुंबई उपनगरचे पालकमंत्री, कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

६८व्या वर्षी प्रख्यात वकील हरीश साळवे तिसऱ्या विवाहबंधनात

आनंद साजरा करण्यासाठी बुमराह परतला मायदेशी

लंडनमधील महाराष्ट्र भवनच्या वास्तूत येताना आनंद वाटतो

पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात रॉकेटला गती

धर्म विरोधी लोकांना सनातन हिंदु धर्म कधीच समजू शकला नाही आणि भविष्यातही समजू शकणार नाही! कारण, सनातन संस्कृती ही कोणत्याही प्रकारे प्रभावी औषधासारखी आहे, जी राष्ट्र विरोधी विचारधारेला भारतात वाढू देत नाही! काही समाजकंटकाकडून हिंदू धर्माला बदनाम केले जात आहे. सनातन धर्म नवीन गोष्ट आत्मसात करण्याची, काळानुसार बदलण्याची आणि सत्याच्या शोधासाठी प्रत्येकाला स्वतःच्या मार्गावर चालण्याची मुभा देणारा भाव प्रतिबिंबित करणारा धर्म आहे. उदयनिधी स्टॅलिनचा दुष्ट हेतू यातून समोर आला आहे. अशा प्रकारचे लोक महाराष्ट्रातले वातावरण बिघडू शकतात. त्यामुळे आता संघटित होऊन यांना कठोर विरोध केला पाहिजे. त्यामुळे जोपर्यंत उदयनिधी स्टॅलिन आपले विधान मागे घेऊन माफी मागत नाही तोपर्यंत त्याला महाराष्ट्रात येण्यास बंदी घालावी अशी मागणी कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा