पवईतील एका फ्लॅटमध्ये २४ वर्षीय ट्रेनी एअर होस्टेसचा गळा चिरलेल्या अवस्थेतला मृतदेह सापडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी ४ पोलीस पथके तयार करण्यात आली होती. अखेर या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे..
रुपल ओग्रे (२४) असे या एअर हॉस्टेल तरुणीचे नाव आहे. मूळची छत्तीसगढ राज्यातील रुपल ही बहिण आणि बहिणीच्या प्रियकरासोबत अंधेरीतील मरोळ येथील टाटा पॉवर सेंटर बस स्थानकाजवळील कृष्णलाल मारवाह मार्गावर असलेल्या एनजी कॉम्प्लेक्स मध्ये राहण्यास होती. बहीण आणि बहिणीचा प्रियकर आठ दिवसांपूर्वी वैयक्तिक कामासाठी गावी गेले होते. सोमवारी सकाळी रुपल हिचा मृतदेह राहत्या घरातील बेडरूममध्ये पवई पोलिसांना मिळून आला.याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपल ही प्रशिक्षणार्थी एअर होस्टेस म्हणून काम करत होती. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली असून तो या इमारतीत स्वच्छतेचे काम करण्यासाठी खाजगी कंपनीतून येत असे. त्यानेच या महिलेच्या घरात प्रवेश केला होता.
हे ही वाचा:
ज्येष्ठ साहित्यिक, प्राध्यापक श्रावण गिरी यांचे अपघाती निधन
६८व्या वर्षी प्रख्यात वकील हरीश साळवे तिसऱ्या विवाहबंधनात
मराठा आरक्षण आंदोलक पवारांवर नाराज का झाले?
राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंकडे अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मागितले होते, पण…
रुपल ओग्रे असे पीडित महिलेचे नाव असून ती मूळची छत्तीसगडची आहे. एअर इंडियामध्ये प्रशिक्षणासाठी ती एप्रिलमध्ये मुंबईत आली होती. रुपल रविवारी सकाळी तिच्या कुटुंबीयांशी व्हॉट्सऍप व्हिडिओ कॉलवर शेवटचे बोलली होती. त्यामुळे रविवारी दुपार ते सोमवारी पहाटेच्या दरम्यान हा खून झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.तिच्या हत्येची माहिती तिच्या कुटुंबियांना देण्यात आली असून तीचे कुटुंब मुंबईकडे रवाना झाले आहे.
एका पोलिस सूत्राने सांगितले की, एअर होस्टेसचा काही दिवसांपूर्वी घरातील नोकराशी काही मुद्द्यावरून जोरदार वाद झाला होता आणि तिला धडा शिकविण्यासाठी त्याने या एअर होस्टेसची हत्या केल्याचा आरोप आहे. त्या नोकराने तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रतिकार केल्याने त्याच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे, असे सूत्राने सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताची कसून चौकशी केली जात असून, त्याची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर त्याला अटक केली जाईल.