काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा, राज्य सचिव संदीप वाल्मिकी आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या इतर पदाधिकाऱ्यांनी सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून गरीबी रेषेखाली येणाऱ्या लोकांसाठी मोफत औषधे, तपासण्यांची व्यवस्था करावी अशी मागणी केली होती. पालिका रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी असलेल्या व्यवस्थेप्रमाणे सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्येही अशीच व्यवस्था करण्याची ही मागणी होती. त्याला सेव्हन हिल्स ह़ॉस्पिटलने उत्तर देत या हॉस्पिटलच्या विशेष अधिकाऱ्यांना (मुंबई महानगरपालिका) यासंदर्भात पत्र लिहून विचारणा केली आहे.
हे ही वाचा:
धर्मांतर कराल तर सावधान… शासकीय लाभ मिळणार नाहीत
चीनचे अध्यक्ष जिनपिंग जी-२० परिषदेला अनुपस्थित राहणार, मग कोण येणार?
काँग्रेस नेत्या सोनिया गांधींना केले रुग्णालयात दाखल
जेटच्या नरेश गोयल यांनी परदेशातल्या मालमत्तेसाठी बँक कर्जाचा निधी वळवला
सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या वतीने १ सप्टेंबरला पत्र लिहून ही विचारणा करण्यात आली होती. त्यांनी या विशेष अधिकाऱ्यांना विचारले आहे की, आम्हाला केशरी आणि पिवळे रेशन कार्ड असलेल्या लोकांसाठी पालिका रुग्णालयात ज्या पद्धतीने औषधे, तपासण्या यासाठी सवलत दिली जाते तशीच सवलत देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. पालिका रुग्णालयात या वर्गवारीतील गरीब रुग्णांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. त्यामुळे आपण आम्हाला मार्गदर्शन करावे की, सेव्हन हिल्स हॉस्पिटलनेही पालिका रुग्णालयात जी व्यवस्था राबविण्यात येते तीच इथेही राबवावी का?