25 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरक्राईमनामानाशिकचे बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचं अपहरण !

नाशिकचे बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचं अपहरण !

राहत्या घराबाहेरून पारख यांच अपहरण केल्याने शहरात भीतीचे वातावरण

Google News Follow

Related

नाशिकचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि गजरा ग्रुपचे प्रमुख हेमंत पारख यांचे अपहरण झाले आहे. नाशिक शहरातील इंदिरानगर भागात वास्तव्यास असलेल्या पारख यांचे राहत्या घरासमोरुन शनिवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास अपहरण करण्यात आल्याचे समोर आले आहे.व्यावसायिकाचे अचानकपणे अपहरण झाल्याने भागात एकच खळबळ उडाली.पोलिसांकडून अपहरण कर्त्यांचा शोध सुरु आहे.

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीमध्ये नाशिक शहराचे नाव जोडले गेले आहे.उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत प्रश्न उपस्थित केला होता.एकीकडे वाढत्या गुन्हेगारीमुळे नाशिक शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.त्यातच एक अपहरणाची घटना घडली.काल रात्री (शनिवारी) नाशिकमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असलेले हेमंत पारख यांचे अपहरण करण्यात आले.रात्रीच्या सुमारास पारख हे घराबाहेर असताना अचानक काही अज्ञात इसम पारख यांच्या घरासमोर आले.अज्ञात इसमांनी पारख यांना पकडून चार-चाकी गाडीत घालून पळ काढला.पारख यांना घरासमोरुन उचलण्यात आल्याने नाशिक शहरात खळबळ उडाली. पारख यांचे अपहरण झाल्याचे कळताच स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिली.

हे ही वाचा:

बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे दोन अधिकाऱ्यांसह एक दोषी

आदित्य एल1 सूर्याकडे झेपावले!

सुधीर मोरे आत्महत्या प्रकरणी माजी आमदारांच्या मुलीवर गुन्हा दाखल

महिला सदस्यांच्या गोलमेज परिषदा महाराष्ट्रातही व्हाव्यात

त्यानंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळावर दाखल झाला.अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करत परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी सुरु केली आहे. हेमंत पारख यांचे नेमक्या कोणत्या कारणासाठी अपहरण करण्यात आले, अपहरणकर्ते नेमके कोण आहेत, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. नाशिक पोलिसांकडून याप्रकरणी ग्रामीण पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून जागोजागी नाकाबंदी करत पोलीस तपास करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा