राजस्थानमधील प्रतापगड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेला मारहाण करून विवस्त्र केल्याची घटना समोर आली आहे. ही महिला गर्भवती असून या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी पहाडी गावातील एका २१ वर्षीय महिलेला तिच्या पती आणि काही नातेवाईकांनी विवस्त्र करून तिची धींड गावातून काढली. यावेळी ही महिला मदतीसाठी हाक देत होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या महिलेचे दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध आहेत असा संशय तिच्या पतीला आणि तिच्या सासरच्यांना होता. याच संशयावरुन तिची धिंड काढण्यात आली. ही महिला गर्भवती आहे. ही महिला लग्नानंतरही दुसऱ्या पुरुषाबरोबर राहात होती. त्याच गोष्टीचा राग मनात ठेवून तिला त्या घरातून पळवून गावात आणण्यात आलं. तिच्या पतीने आणि तिच्या सासरच्या मंडळींनी तिला मारहाण करुन तिला विवस्त्र केलं आणि त्यानंतर तिची धिंड काढली.
घटनेची वाच्यता होताच पोलिसांनी महिलेच्या पतीसह अन्य तीन जणांना ताब्यात घेतले आहे. इतर सहभागी नातेवाईकांचा पोलीस तपास करत आहेत. पोलिस महासंचलकाचे उमेश मिश्रा यांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी फरार नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी सहा जणांचे पथक तयार करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
सुधीर मोरे आत्महत्या प्रकरणी माजी आमदारांच्या मुलीवर गुन्हा दाखल
डिजिटल इंडियाचे ऑगस्टमध्ये युपीआयद्वारे १ हजार कोटींपेक्षा जास्त व्यवहार!
चांद्रयान- ३ पेक्षाही कमी खर्चात आदित्य L1 सूर्याकडे पोहचणार
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “प्रतापगढ जिल्ह्यात जी घटना घडली ती कौटुंबिक वादातून झाली. एका २१ वर्षीय विवाहितेची नग्न धिंड काढण्यात आली. या प्रकरणातला तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलीस महासंचालकांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारचे अपराध करणाऱ्यांना समाजात स्थान नाही. या गुन्हेगारांची जागा गजांच्या आडच आहे. त्यांच्याविरोधात खटला चालवला जाईल आणि फास्ट ट्रॅक कोर्टात जलदगतीने निर्णय घेऊन शिक्षा सुनावली जाईल.”
प्रतापगढ़ जिले में पीहर और ससुराल पक्ष के आपसी पारिवारिक विवाद में ससुराल पक्ष के लोगों द्वारा एक महिला को निर्वस्त्र करने का एक वीडियो सामने आया है।
पुलिस महानिदेशक को एडीजी क्राइम को मौके पर भेजने एवं इस मामले में कड़ी से कड़ी कार्रवाई के निर्देश दिए हैं।
सभ्य समाज में इस…
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) September 1, 2023