इंडी आघाडीच्या दोन दिवसांच्या परिषदेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ३१ ऑगस्टला पत्रकार परिषद घेत अदानींवर शरसंधान केले होते, मात्र त्यामुळे या आघाडीतील तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी नाराज झाल्या आहेत. या आघाडीतील पक्षांना विश्वासात न घेता त्यांनी अदानींच्या मुद्द्यावर बोलल्यामुळे ममतांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे इंडी आघाडीत अजूनही सगळ्या पक्षात सुसंवाद नाही, याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
हे ही वाचा:
जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज; आंदोलकांकडून जाळपोळ
गेल्या चार वर्षांत ४ कोटी नोकऱ्या झाल्या उपलब्ध !
‘इंडिया’ची बैठक समाप्त; अजूनही लोगोवर एकमत नाही
पहाड खोदून लोगो सुद्धा काढता आला नाही हो यांना…
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी यांची नाराजी यासाठी आहे की, जर आपण एका आघाडीच्या माध्यमातून वाटचाल करत आहोत तर त्यातील प्रत्येक चाल ही एकमेकांशी संवाद साधूनच खेळली गेली पाहिजे. पण राहुल गांधींनी अदानींच्या मुद्द्यावर कुणाशीही चर्चा न करता थेट सरकारवर आरोप केले. या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेतून ममता बॅनर्जी मधूनच निघून गेल्यामुळे त्यांच्या या नाराजीला पुष्टी मिळाली आहे.