इंडि अलायन्सची मुंबईत दोन दिवसांची परिषद होत आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला पाडण्यासाठी केलेल्या या एकजुटीत उद्धव ठाकरेही सहभागी आहेत. त्यांच्यावर टीकेची झोड उठलेली असताना आता त्याचसंदर्भात मुंबईत काही पोस्टर्स लागली आहेत. ज्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे.
असे अनेक पोस्टर्स मुंबईत लागले असून त्यावर कोणत्याही पक्षाचा किंवा व्यक्तीचा उल्लेख नाही. केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असून त्यावर त्यांचे एक वाक्य लिहिण्यात आले आहे. मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
हे ही वाचा:
विक्रम लँडरच्या सर्व उपकरणाचे काम संपले की नासाचे ‘एलआरए’चे ऍक्टिव्ह होईल
शेवटपर्यंत मातीशी एकनिष्ठ राहणार
‘कलम ३७० हे १९५७मध्येच रद्द करायला हवे होते’
जॉर्जियाकडून ऑक्टोबर महिना ‘हिंदू हेरिटेज मंथ’ म्हणून घोषित
या पोस्टरची सध्या समाजमाध्यमात चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या यजमानपदाखाली I N D I A ची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहेत. त्यावरून विरोधकांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले असून सोनिया गांधी व राहुल गांधी यांना बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर घेऊन या म्हणून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी आव्हान दिले होते. भाजपा आमदार नितेश राणे यांनीही उद्धव ठाकरे गटाला याच मुद्द्यावरून डिवचले होते.