ऑनलाईन गेमिंगची जाहिरात केल्याप्रकरणी प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या घराबाहेर आंदोलन केले. दरम्यान, काही वेळातच पोलिसांनी बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
सचिन तेंडुलरकने याने काही दिवसांपूर्वी एका ऑनलाईन गेमची जाहिरात केली होती. या जाहिरातीवर बच्चू कडू यांनी आक्षेप घेतला होता. सचिन तेंडुलकर यांचे खूप चाहते आहेत. असे असताना त्यांनी ऑनलाईन गेमिंगची जाहिरात केल्यामुळे त्याचे परिणाम जनमानसावर पडत आहेत. कुटुंबं उध्वस्त होत आहेत. सचिन तेंडूलकर यांनी जाहिरात सोडावी किंवा भारतरत्न तरी परत करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
त्यांच्याकडे भारतरत्न नसता, तर आम्ही काही बोललो नसतो. पण, ते देशाचे भारतरत्न आहेत. त्यांनी जर ही जाहिरात सोडली नाही, तर आम्ही प्रत्येक गणपती मंडळासमोर दानपेटी ठेवणार आहोत. तसेच गणपतीलाही प्रार्थना करणार आहोत की, सचिन तेंडुलकर यांना चांगली बुद्धी द्यावी. दानपेटीत जमा होणारा सर्व पैसे गणेश विसर्जनाच्या दिवशी सचिन तेंडूलकर आणून दिला जाईल. पैसा महत्त्वाचा नाही, देश महत्त्वाचा आहे, हे सचिन तेंडुलकर यांनी लक्षात घेतलं पाहिजे, अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली आहे.
काय आहे प्रकरण?
सचिन तेंडुलरकने याने काही दिवसांपूर्वी एका ऑनलाईन गेमची जाहिरात केली होती. या जाहिरातीवर बच्चू कडू यांनी आक्षेप घेतला होता. या जाहिरातीमध्ये अप्रत्यक्षपणे जुगाराचे समर्थन करण्यात आल्याचे मत कडू यांचे आहे. त्यामुळे सचिन यांनी अशा प्रकारच्या जाहिराती करू नये आणि माफी मागावी, अशी मागणी केली होती. या प्रकरणी कडू यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातही भाष्य केले होते.
हे ही वाचा:
८० टक्के भारतीय म्हणतात पुन्हा मोदीच!
‘इंडिया’च्या बैठकांचे आयोजन करणारे उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार पायदळी उडवतायत
भारतात होणार पहिली ‘ग्लोबल इंडिया एआय- २०२३’ परिषद
अजितदादांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, शरद पवारांनी पुतण्याविरोधात दंड थोपटले
सचिनने तेंडूलकर याने ऑनलाईन गेमिंगच्या जाहिरातीतून माघार घ्यावी, नाहीतर त्यांच्या घरासमोर आंदोलन करू, असा इशारा कडू यांनी दिला होता. तसेच भारतरत्न पुरस्कार परत करण्याची मागणी केली होती.