चेंबूर येथे १७ वर्षाच्या मुलाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून घरात लपवून ठेवणाऱ्या मानलेल्या बहिणीच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. मानलेल्या बहिणी सोबत अश्लील चाळे करीत असल्याच्या संशयावरून ही हत्या केल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या आरोपीने दिली आहे. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी हत्या आणि पुरावा नष्ट केल्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईश्वर मारवाडी (१७)असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. ईश्वर हा ८ वर्षाचा असताना त्याच्या आईवडिलांचे निधन झाले. त्यानंतर चेंबूर भारत नगर,म्हाडा वसाहत येथे राहणाऱ्या एका कुटुंबाने त्याचा सांभाळ करून त्याला मानस पुत्र मानले होते. त्याच कुटूंबातील तरुणीचे लग्न म्हाडा वसाहत येथे राहणारा रिक्षा चालक शफीक अहमद अब्दुल मलिक शेख याच्यासोबत झाले होते. शफीकची पत्नी ही माहेरीच राहण्यास होती व शफीक देखील जेवायला सासरीच जात असे.
हे ही वाचा:
अजितदादांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, शरद पवारांनी पुतण्याविरोधात दंड थोपटले
जी२० च्या पाहुण्यांना त्रास नको म्हणून दिल्लीत लंगूरचे कटआऊट !
कुर्ल्यात गुंडाने केला गोळीबार, पूर्ववैमनस्यातून घडली घटना
लोखंडवाला १२० फूट डीपी रोड वाहतुकीसाठी पुन्हा खुला
२८ ऑगस्ट रोजी शफीक आणि ईश्वर सोबत गेले होते. त्यानंतर ईश्वर हा बेपत्ता झाला होता. शफीकच्या सासऱ्यांनी त्याच्याकडे अनेक वेळा ईश्वर बाबत चौकशी केली परंतु तो उडवा उडवीची उत्तरे देत होता. अखेर ईश्वरचा मानलेल्या पित्याने याबाबत पोलिसांकडे संशय व्यक्त केला. बुधवारी सकाळी पोलिसांनी शफीकला ताब्यात घेऊन त्याच्या कडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली. ईश्वर हा आपल्या पत्नीची जवळीक साधून तिच्या अंगाशी छेडछाड करायचा हे शफीकला आवडत नव्हते. त्याने ईश्वरला समज दिली होती,परंतु ईश्वरला समज देऊनही तो ऐकत नसल्याचे बघून अखेर त्याला संपविण्याचे ठरवले.
सोमवारी शफीक हा ईश्वरला घेऊन स्वतःच्या घरी आला व त्या ठिकाणी ईश्वरची कोयत्याने हत्या केली. ईश्वरच्या मृतदेहाचे चार तुकडे करून मृतदेह गोणीत कोंबून स्वयंपाक घरात लपवून ठेवला होता.अशी माहिती समोर आली.