भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) पहिल्या मानवासहित उड्डाणाची तयारी करत आहे. या संदर्भात बोलताना इस्रोचे अध्यक्ष के सिवन यांनी इस्रो हे उड्डाण हरित इंधनांच्या सहाय्याने करणार असल्याचे सांगितले होते. इंडियन इकॉनॉमिक कॉनक्लेवमध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी त्यांनी इस्रोला कोणत्याही तऱ्हेची विषारी आणि धोकादायक इंधने टाळायची आहेत, यावर जोर दिला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार संस्था हरित इंधनांच्या विकासाच्या दृष्टीने कार्यरत आहे.
हरित इंधनांबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, “हरित इंधन आवश्यक आहे. आम्ही गगनयान मोहिमा हरित इंधनांच्या सहाय्याने करणार आहोत. आता हे अत्यावश्यक झाले आहे.”
हे ही वाचा:
संजय राऊतांवर ट्वीट करून शरद पवारांना आवाहन करण्याची वेळ
तृणमुलच्या गुंडांचे क्रौर्य, ८५ वर्षांच्या वृद्धेलाही मारले
संजय राऊतांची पुन्हा अर्ध्या तासात पलटी
ते म्हणाले की, “हरित इंधनांचा विकास करणे ही काळाची गरज झाली आहे आणि लवकरच आम्ही आमची उड्डाणे हरित इंधनांवर करू. आम्हाला विषारी आणि घातक इंधनांचा वापर कटाक्षाने टाळायचा आहे. हरित इंधनांचा विकास फास्ट ट्रॅक मोडवर आहे आणि लवकरच आमची रॉकेट हरित इंधनांवर उड्डाण करतील. हे आमचे लक्ष्य आहे.”
त्याबरोबरच त्यांनी भारताचे कोको बेटांजवळ गगनयान मोहिमांसाठी एक स्थानक उभे करण्याचा विचार आहे असेही सांगितले. त्याशिवाय इस्रो ऑस्ट्रेलियामध्ये एक ‘नाविक’ केंद्र उभारणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
आणखी एका मनुष्य विरहीत उड्डाणानंतर भारताचे पहिले मानवसहित उड्डाण होणार आहे.