ऐन सणासुदीच्या दिवशी कुर्ल्यात गोळीबार झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुंडाने पूर्ववैमन्स्यतून एकावर हा गोळीबार केला असून सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. ही घटना कुर्ल्यातील हलवा पूल जवळील जय शंकर चौक या ठिकाणी घडली.
आशिष लक्ष्मण पवार (४०) आणि गणेश पवार असे हल्लेखोरांचे नावे आहेत. आशिष पवार हा सराईत गुन्हेगार असून कुर्ला,विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर १० पेक्षा अधिक गंभीर गुन्हे असून काही गुन्ह्यात तो जामिनावर बाहेर आलेला आहे. विनोबा भावे नगर पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी तडीपार केले होते.
हे ही वाचा:
ममता बॅनर्जी, राहुल गांधींनंतर अरविंद केजरीवाल पंतप्रधान पदाच्या शर्यतीत
भाभा अणुसंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञाची आत्महत्या
प्रज्ञान रोव्हरला चंद्रावर सापडला ऑक्सिजन आणि काही धातू
चीनच्या कुरापती सुरूच; अक्साई चीन परिसरात उभारले जात आहेत बंकर
कुर्ला पश्चिम मसराणी लेन येथील जय शंकर चौक या ठिकाणी राहणारा संतोष पवार सोबत आशिष पवार यांचे जुने वैर आहे. आशिष पवार हा देखील त्याच परिसरात राहणारा असून बुधवारी रक्षाबंधन असल्यामुळे आशिष हा राखी बांधण्यासाठी जय शंकर चौक येथे आला होता. सकाळी १०वाजण्याच्या सुमारास संतोष आणि आशिष हे समोरासमोर आले व दोघात शाब्दिक वाद झाला, या वादात आशिष सोबत असलेल्या गणेशने संतोष वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता संतोष तेथून पळून गेला. पळून जात असताना आशिषने स्वत:जवळील रिव्हॉल्व्हर काढून संतोष पवारच्या दिशेने गोळीबार केला, त्यात संतोष हा थोडक्यात बचावला.
या गोळीबाराच्या घटनेमुळे ऐन सणासुदीच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबाराची माहिती मिळताच विनोबा भावे नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्याचे येत असल्याचे कळताच आशिष आणि गणेश यांनी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आशिष आणि गणेश यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.