चीनच्या सीमाभागात कुरापती सुरूच आहेत. नुकतेच अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश हा आपला भूभाग असल्याचे सांगून चीनने नवीन नकाशे जारी केले. तर सॅटेलाईटने काढलेल्या छायाचित्रांमधून काही धक्कदायक बाबी समोर आल्या आहेत. अक्साई चीनमध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीकडून मोठ्या प्रमाणात निर्माण कार्य सुरू असल्याचे दिसून येत आहे. तसेच अंडरग्राऊंड गुप्त ठिकाणेही मोठ्या प्रमाणात उभारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) पूर्वेकडील अक्साई चीन परिसरात बोगदे बांधण्यात येत आहेत. नदीच्या खोऱ्याच्या दोन्ही बाजूला त्यांनी सैनिक आणि शस्त्रास्त्रांसाठी बोगदे आणि बंकर बनविण्याचे काम सुरू केले आहे. ही बांधकामे उत्तर लडाखमधील डेपसांग मैदानापासून ६० किलोमीटर अंतरावर दिसली आहेत. हे क्षेत्र LAC च्या पूर्वेस अक्साई चीनमध्ये आहे.
आंतरराष्ट्रीय जिओ- इंटेलिजन्स तज्ञांनी मॅक्सर वरून एका आठवड्यापेक्षा जास्त काळ चॅनलने घेतलेल्या फोटोंचे विश्लेषण केले आहे. यामध्ये नदीच्या खोऱ्याच्या दोन्ही बाजूला ११ पोर्टल्स आणि शाफ्ट बांधण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून येथे मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. संघर्षाच्या काळात शस्त्रसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि हवाई हल्ल्यांपासून सुरक्षा मिळवण्यासाठी ही तयारी करण्यात आल्याचे तज्ञांचे मत आहे.
चीनने नुकताच आपल्या देशाचा नकाशा जाहीर केला होता. यात चीनने अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचं दाखवलं होतं. चीनच्या मंत्रालयाकडून सोमवारी हा नकाशा जाहीर करण्यात आला. यावर भारत सरकारकडून आक्षेप घेण्यात आला आहे. चीनने हा नकाशा समोर आणल्यानंतर सॅटेलाईट छायाचित्रांमधून अक्साई चीनमध्ये मोठ्या प्रमाणात निर्मिती कार्य सुरु असल्याचं दिसतंय.
हे ही वाचा:
पंतप्रधानांची रक्षाबंधन भेट; गॅसच्या किमती २०० रुपयांनी घटल्या
लोकसभेच्या १६० कमकुवत जागा जिंकण्यासाठी अमित शहा सरसावले
‘कलम ‘३५ अ’ ने जम्मू-काश्मीरच्या लोकांचे मूलभूत अधिकार काढून घेतले’
काश्मीरमध्ये रंगणार ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा!
अरुणाचल प्रदेश तिबेटचा दक्षिण भाग असल्याचा चीनदा दावा आहे. तैवानला नकाशामध्ये स्थान देण्यात आले आहे. चीनचा अनेक भागावरुन इतर देशांची वाद आहे. नव्या नकाशामुळे हा वाद पुन्हा उफाळून आला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची जी-२० संमेलनादरम्यान भेट झाली होती.