भारताने चांद्रयान ३ ही मोहीम यशस्वीरित्या राबविल्यानंतर त्यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली. यात काँग्रेसने इस्रो या भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे श्रेय भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना देण्यासाठी आटापीटा सुरू केला आहे. मात्र त्यामागील वास्तव वेगळे आहे. यासंदर्भात आता एक देश कपूर यांचा व्हीडिओ व्हायरल होत असून त्यात यासंदर्भातील इतिहास कथन करण्यात आला आहे.
त्यात म्हटले आहे की, इस्रोच्या निर्मितीआधी इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च (इन्कोस्पार) ही संस्था प्रसिद्ध वैज्ञानिक विक्रम साराभाई यांनी स्थापन केली. भारतीय अवकाश संशोधनासाठी दरवाजे खुले करण्यासाठीही संस्था स्थापन करण्यात आली. ही संस्था टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) संस्थेचा भाग होती. ही संस्था होमी भाभांच्या प्रयत्नांमुळे स्थापन झाली. होम भाभा यांनी दोराबजी टाटा ट्रस्ट यांच्याकडे आर्थिक मदतीसाठी आवाहन केले. जेआरडी टाटा यांनी भाभा यांच्या या कल्पनेला उचलून धरले आणि त्यांनी मदत केली. टीआयएफआर स्थापन झाली ती तारीख होती १ जून १९४५. तेव्हा भारताला स्वातंत्र्यही मिळाले नव्हते. त्यामुळे जवाहरलाल नेहरू यांनी कोणताही निर्णय त्यावेळी घेण्याची शक्यता नव्हती.
त्यात पुढे म्हटले आहे की, ही संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरू येथे होती. या संस्थेचा उल्लेख स्वामी विवेकानंद आणि जमशेदजी टाटा यांच्यातील संवादात येतो. १८९३ मध्ये अमेरिकेला बोटीने जात असताना स्वामी विवेकानंद यांनी जमशेदजींना म्हटले की, मूलभूत विज्ञान संशोधनासाठी एखादी संस्था उभी करण्याची आवश्यकता आहे. जमशेदजी यांनी त्याला पाठिंबा दर्शविला होता. इन्कोस्पार या संस्थेचे रूपांतर इस्रोमध्ये १९६९मध्ये झाले अर्थात नेहरूंच्या निधनानंतर.
ईस्रो आणि नेहरुंचा बादरायण संबंध जोडणाऱ्यांसाठी काही महत्वाचे… pic.twitter.com/CXAiEXRQXQ
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 28, 2023
नेहरूंनी टीआयएफआर या संस्थेला आर्थिक मदत पुरविण्यास होमी भाभा यांना नकार दिला होता. त्यांनी ही मदत थांबविली. यासंदर्भातील एक पत्रच उपलब्ध आहे. ३० जून १९६० रोजी नेहरूंनी होमी भाभांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, तुमचे २८ जूनचे पत्र मिळाले. अवकाश संशोधनाच्या पाच वर्षांच्या योजनेच्या मसुद्यात आता मोठे बदल करणे शक्य नाही. पण मी त्रिवेदी यांना पत्र लिहून काय करता येईल ते पाहावे असे म्हटले आहे. मात्र याव्यतिरिक्त या मसुद्याला तुम्ही फार महत्त्व देऊ नये. हा मसुदा तात्पुरता आहे. त्यामुळे तुम्ही इथे येऊन भेट घेण्यातून फारसे काही हाती लागणार नाही. मी काश्मीरला काही दिवसांसाठी जात आहे. त्यामुळे मी खूप व्यस्त असेन.
हे ही वाचा:
२८ फुटी नटराज मूर्तीचा अडीच हजार किमी प्रवास
राज्यात हातभट्टीमुक्त गाव अभियान लवकरच राबवणार
सर्वेक्षणाच्या निकालामुळे राजस्थानातील काँग्रेसच्या गोटात चिंता
सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरस्कारांच्या रकमेत दुप्पट वाढ
भारताच्या अवकाश संशोधनासाठी निधी पुरविण्याचे काम टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने केले. तत्कालिन भारत सरकारने नव्हे. नेहरू यांचे निधन १९६४ला झाले. त्यामुळे नेहरूंचे इन्कोस्पार या संस्थेच्या उभारणीत कोणतेही योगदान नव्हते किंवा इस्रोच्या निर्मितीतही. शिवाय, त्यांनी या संस्थांना निधी पुरविण्यातही रस दाखविला नाही. मग नेहरूंना भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे श्रेय देण्याचे प्रयोजन काय? असा प्रश्न निर्माण होतो.