30 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरराजकारण‘इंडिया’ गटाला धक्का? ‘आप’ बिहार विधानसभा निवडणूक लढवणार

‘इंडिया’ गटाला धक्का? ‘आप’ बिहार विधानसभा निवडणूक लढवणार

बिहारमध्ये २०२५मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

Google News Follow

Related

अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने शनिवारी बिहारमधील पुढील विधानसभा निवडणुका लढवण्याची योजना जाहीर केली. त्यामुळे सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत विरोधी पक्षांची एकजूट आणखी कमी होऊ शकते. ‘आप’चे सरचिटणीस संदीप पाठक यांनी नवी दिल्लीत आपच्या बिहार युनिटच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. बिहारमध्ये २०२५मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.  

बैठकीत संदीप पाठक यांनी बिहारमध्ये पक्ष मजबूत करण्यावर भर दिला. दिल्लीतील ‘आप’चे आमदार आणि बिहारचे प्रभारी अजेश यादव यांनीही या बैठकीला हजेरी लावली. ‘बिहारचे दुर्दैव आहे की, घाणेरड्या राजकारणामुळे राज्य जिथे पोहोचायला हवे होते, त्याच्या पुढे जाऊ शकले नाही. आप बिहारमध्ये निवडणूक लढवणार आहे. परंतु, निवडणूक लढवण्यासाठी मजबूत संघटन आवश्यक आहे,’ असे पाठक म्हणाले.    

पाठक यांनी बिहारमधील पक्षाच्या नेत्यांना त्यांच्या संघटनेचा विस्तार करण्यासाठी प्रत्येक गावात समित्या बांधण्याचे आवाहन केले. ‘आम्ही बिहारमध्ये निवडणूक लढवू, परंतु कधी लढायचे हे पक्ष ठरवेल. बिहारमध्ये आम्ही थेट निवडणूक लढवू शकत नाही, त्यासाठी आम्हाला अगोदर संघटना मजबूत करावी लागेल. प्रत्येक गावात आपली समिती स्थापन करावी लागेल. संघटना मजबूत आणि वाढवण्यासाठी आतापासूनच मेहनत घ्यावी लागेल. संघटना मजबूत झाली की आपण निवडणूक लढवू आणि जिंकू,’ असेही पाठक पुढे म्हणाले. निवडणूक लढवण्यासाठी एक मजबूत संघटना आवश्यक आहे यावर जोर देऊन पाठक म्हणाले की, गुजरातमध्ये ज्याप्रकारे आपने पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवली, त्याचप्रमाणे बिहारमध्येही लढवली जाईल.  

हे ही वाचा:

चंद्रावर मातोश्री ३चा प्लॅन तर नाही ना?

अफगाणिस्तानात आता हिजाब व्यवस्थित न घातल्यास महिलांना उद्यानबंदी

हिंगोलीत मविआचे विसर्जन झाले काय?

उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत अधिकाधिक मंडळांनी सहभाग घ्यावा

आपल्या योजनांबद्दल पाठक यांनी अधिक माहिती दिली. ‘पक्ष प्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांद्वारे राज्यात प्रवेश करेल,’ असे त्यांनी सांगितले. पाठक यांनी यावेळी भाजपलाही लक्ष्य केले. ‘देश कठीण काळातून जात आहे आणि पंतप्रधान मोदींकडे गेल्या नऊ वर्षांतील भाषणांशिवाय बाकी कशावरही उत्तर नाही,’ अशी टीका त्यांनी केली. इंडिया गटाबाबतही त्यांनी ‘आमची मते भिन्न असली तरी देशाला आमचे प्रथम प्राधान्य आहे,’ असे त्यांनी सांगितले. ‘आप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि लोकसभा निवडणूक लढवणार आहे. युतीबाबतचा निर्णय नंतर येईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले.    

भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सय्यद शाहनवाज हुसेन यांनी मात्र, बिहारमध्ये सर्वच्या सर्व ४० जागा एनडीए जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला. आप बिहारमध्ये लोकसभा निवडणूक लढवू शकते. आम्हाला कोणतीही अडचण नाही. ज्यांनी त्यांना बिहारमध्ये आमंत्रित केले, त्यांच्यासाठी ती अडचण ठरेल, असेही ते म्हणाले. तर, राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.    

‘जेव्हा इंडिया आघाडीचा पाया रचला जात होता, तेव्हा काही तत्त्वे तयार झाली होती. या तत्त्वांबद्दल सविस्तर चर्चा झाली. आप त्या तत्त्वांचे पालन करतील,’ असे ते म्हणाले. तर, संयुक्त जनता दलाचे नेते नीरज कुमार यांनी प्रत्येक पक्षाला स्वतःचा विस्तार करण्याचा अधिकार आहे. आम्हीदेखील इतर राज्यांमध्येही विस्तार करू. मल्लिकार्जुन खर्गे आणि संजय सिंह या दोघांनीही आम्ही एकत्र लढू, असे स्पष्टपणे सांगितले आहे. राज्यांमधील ‘इंडिया’ आघाडीतील मतभेद या काळात मिटवले जातील,’ अशी प्रतिकिर्या दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा