30 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरक्राईमनामासीबीआय चौकशी सुरू असलेल्या सीमाशुल्क अधिकाऱ्याची आत्महत्या

सीबीआय चौकशी सुरू असलेल्या सीमाशुल्क अधिकाऱ्याची आत्महत्या

सीबीआय चौकशीच्या तणावातून सिंग यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती

Google News Follow

Related

केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरू असलेल्या सीमाशुल्क अधिकाऱ्याने शनिवारी नवी मुंबईतील खारघर येथे एका तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. मयंक सिंग (३८) असे या सीमा शुल्क अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिसांना त्यांच्या मोटारीत एक चिठ्ठी मिळून आली असून सीबीआय चौकशीच्या तणावातून सिंग यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात अपमृत्युची नोंद करण्यात आली आहे.

 

शुक्रवारी सकाळी तळोजा कारागृह जवळ असलेल्या तलावात एका व्यक्तीच्या मृतदेह तरंगत असल्याची माहिती खारघर पोलिसांना मिळाली होती. पोलिसानी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. त्याच्या जवळील ओळखपत्रा वरून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली.

 

हे ही वाचा:

भामटा मणिशंकर म्हणतोय नरसिंहराव भाजपाचे पहिले पंतप्रधान

‘आयएनएस सुनयना’ची दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन बंदराला भेट

दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी प्रज्ञान रोव्हरच्या ‘शिवशक्ती’ पॉइंटभोवती प्रदक्षिणा

मादागास्करमधील स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत १२ लोकांचा मृत्यू

 

मृतदेह सीमाशुल्क अधिकारी मयंक सिंग यांचा असल्याचे उघडकीस आले.दरम्यान तलावाजवळ मिळून आलेली मोटार ही मयांक सिंग यांची असल्याचे पोलिसांना समजताच पोलिसानी मोटारीची तपासणी केली असता पोलिसांना मोटारीत एक चिठ्ठी मिळून आली आहे. पोलिसांनी सुसाईड नोटमधील मजकूर उघड केला नसला तरी एका अधिकाऱ्याने सांगितले की, सिंग त्याच्याविरुद्ध सीबीआयच्या चौकशीमुळे ते तणावाखाली होते.त्याला यापूर्वी सीबीआयने चौकशीसाठी बोलावले होते आणि शुक्रवारी पुन्हा समन्स बजावण्यात आले होते. एकूण १४.५ लाख दंडाची रक्कम न भरता माल सोडण्यासाठी दोन कंपन्यांकडून कथितपणे लाच घेण्यात आल्याच्या प्रकरणाची मयांक सिंगची सीबीआय कडून चौकशी करीत होते.

 

सिंग यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप आहे आणि दोन कंपन्यांचीही आरोपी म्हणून नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंग हे खारघर परिसरात राहत होते आणि त्यांची पत्नी त्यांच्यापासून वेगळे राहत होते , दिल्ली न्यायालयात घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. “आम्हाला कोणतीही तक्रार आल्यास किंवा आम्हाला तपासात त्यांचा छळ करण्यात आला असे आढळून तर आम्ही या प्रकरणी गुन्हा दाखल करू असे एका पोलीस अधिकारी यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा