अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. ओक्लाहोमा हायस्कूलमध्ये हा गोळीबार झाला. यात चार जण जखमी झाले असून तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. शुक्रवारी रात्री ओक्लाहोमा हायस्कूल येथे फुटबॉल सामन्यादरम्यान ही घटना घडली.
ओक्लाहोमा हायस्कूल येथे चोक्टाव हायस्कूल आणि डेल सिटी हायस्कूल यांच्यात फुटबॉलचा सामना सुरू होता. यावेळी खेळादरम्यान रात्री साडेदहाच्या सुमारास चार जणांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्यानेही गोळीबार केला.
चोक्टाव पोलीस प्रमुख मार्शल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकाला लवकरच रुग्णालयातून उपचार करून सोडण्यात येणार आहे, तर, इतर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळावरून पळून गेलेल्या एका संशयिताचा शोध घेण्यात आला असून अद्याप त्याला ताब्यात घेण्यात आलेले नाही.
हे ही वाचा:
हिमाचल प्रदेशात भूस्खलन; ५४ घरे खचल्याची भीती
पृथ्वी ते चंद्रापर्यंतच्या अंतरापर्यंतचे रस्ते गावागावांत बनले
भारताच्या चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर ब्रिटनने ओकली गरळ
जगद्गुरू रामभद्राचार्य यांच्या अमृतमहोत्सवी जन्मोत्सवाची घोषणा
घटनास्थळी नेमके किती हल्लेखोर होते याची माहिती मिळालेली नाही. डेल शहराचे पोलिस प्रमुख लॉयड बर्जर म्हणाले की, ऑफ- ड्युटी डेल सिटी अधिकारी या सामान्यादरम्यान सुरक्षा पुरवत होते. पोलिसांनी सांगितले की, या गोळीबारात एक अधिकारी सामील होता आणि ओक्लाहोमा काउंटी शेरीफ कार्यालय या अधिकाऱ्याच्या गोळीबारातील सहभागाची चौकशी करेल.