दिवंगत सुशांतसिंह राजपूत एक शिस्तबद्ध अभिनेता म्हणून ओळखला जात होता. त्याने त्याची पात्रे अतिशय उत्कृष्टपणे रंगवली. ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’साठी सुशांतने कठोर क्रीडा प्रशिक्षण घेतले आणि क्रिकेटपटू धोनीसोबत काही तास घालवले.
त्याचप्रमाणे सुशांत शेखर कपूरच्या ‘पानी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी खूप उत्सुक होता. या चित्रपटासाठी सुशांतने अनेक चित्रपटांना नकार दिला होता. कारण त्याला केवळ शेखर कपूरच्या चित्रपटासाठी स्वत:ला समर्पित करायचे होते. मात्र त्याच्या या व्यावसायिकतेला काही लोकांनी अहंकार समजले. त्यांनी गैरसमज करून घेतला.’ कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी हा खुलासा केला आहे.
हे ही वाचा:
चाकरमान्यांना दिलासा; चिपी विमानतळावरून नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होणार
हिमाचल प्रदेशात भूस्खलन; ५४ घरे खचल्याची भीती
लखनऊ- रामेश्वर रेल्वे गाडीला आग लागून आठ जणांचा मृत्यू
जगद्गुरू रामभद्राचार्य यांच्या अमृतमहोत्सवी जन्मोत्सवाची घोषणा
कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी सुशांतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ दिग्दर्शित केला होता. नुकत्याच झालेल्या एका संभाषणात मुकेश यांनी सुशांत याच्यावर अधिक प्रकाश टाकला. ‘पानी’ चित्रपटामुळे त्याने अनेक चित्रपटांना नाही म्हटले. त्यामुळे लोकांना वाटले, तो स्टार झाला आहे, म्हणून तो इतके चित्रपट नाकारतोय. लोक त्याला गर्विष्ठ समजू लागले होते. पण तो चित्रपटाच्या बाबतीत नेहमीच खरा आणि उत्साही होता. त्याला शेखर कपूरसोबत काम करण्याची इच्छा होती. चित्रपटासाठी जेव्हा त्याची निवड झाली, तेव्हा मी तिथेच होतो. लहान मुलांना जसे खेळणे मिळते आणि तो ज्या प्रकारे खूष होतो, त्याच प्रकारे तो या बातमीनंतर खूप खूष झाला होता. दुर्दैवाने, हा चित्रपट प्रत्यक्षात येऊ शकला नाही,’ असे छाब्रा यांनी सांगितले.
‘पानी’ हा चित्रपट शेखर कपूर दिग्दर्शित करणार होते. मात्र यशराज फिल्म्सने या चित्रपटातून माघार घेतल्यामुळे हा चित्रपट आता बंद झाला आहे. शेखर कपूर यांनीही या चित्रपटाची पटकथा उघड केली आहे. ‘पानी एक दिवस पूर्ण होईल, अशी शेखर कपूर यांना आशा होती. मात्र ते होऊ शकले नाही,’ असे छाब्रा म्हणाले.